शिरुर दिनांक ( वार्ताहर ) उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे शिरुर शहरात भव्य स्वागत करण्यात आले .  वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा त्यांनी  स्वीकारल्या .अजितदादा पवार यांनी वाढदिवसाच्या दिवशी आईचे आशिर्वाद घेतले व अहमदनगर जिल्ह्याच्या दौरावर रवाना झाले . पुणे अहमदनगर रस्त्याने नगर कडे जात असताना विविध ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी स्वीकारल्या. रांजणगाव गणपती येथे महगणपतीचे दर्शन घेवून आरती केली. त्यानंतर कार्यकर्त्याच्या शुभेच्छांच्या स्वीकार केला . नंतर शिरुर कडे येत असताना पद्श्री सिंधुताई सपकाळ यांच्या मनशांती छात्रालयाच्या विद्यार्थ्यांनी दादांना  शुभेच्छा दिल्या . शिरुर बायपास रस्त्यावरील सिताबाई थिटे फार्मसी कॉलेज जवळ कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात दादांचे स्वागत करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . याठिकाणी उपस्थित महाविद्यालयीन युवतीशी संवाद साधत त्यांच्या ही शुभेच्छाचा स्वीकार दादांनी केला . दादांशी हस्तादोलन करुन शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची झुबंड उडाली होती . याविविध प्रसंगी पवार यांच्या समवेत माजी आमदार पोपटराव गावडे , राष्ट्रवादीचे शिरुर तालुकाध्यक्ष रवीबापू काळे , शिरुर आंबेगावचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर , घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे , प्रदीप वळसे , शहराध्यक्ष शरद कालेवार , जिल्हा दुध संघाचे संचालक स्वप्नील ढमढेरे ,पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे , आरती भुजबळ , बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे , प्रकाश पवार , माजी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे , माजी सभापती संतोष शितोळे ,युवकचे माजी अध्यक्ष रंजन झांबरे, युवक तालुका अध्यक्ष अमोल वर्पे , जिल्हा महिला अध्यक्षा मोनिका हरगुडे, , शहराध्यक्षा  श्रुतिका झांबरे, माजी सभापती मनीषा कालेवार, तृप्ती सरोदे, पूनम मुत्याळ सुवर्णा सोनवणे, शकिला शेख, शमशाद खान, सोनाली रायभोळे, रुपाली पवार, मनीषा गव्हाणे, मोनिका राठोड, तालुका विद्यार्थी अध्यक्ष अमित गव्हाणे, शहर अध्यक्ष उमेश जाधव, प्रवीण गव्हाणे, तुषार जाधव, नीलेश किसन पवार ,प्राचार्य अमोल शहा , आत्माराम गावडे ,आदी उपस्थित होते .