वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ सुनील गुप्ता व सचिवपदी डॉ ज्ञानेश्वर खरात यांची निवड.
असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर
वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या 23 जुलै 2022 रोजी हॉटेल सीजन्स 24, वाघोली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुढील एक वर्षांसाठी 2022 ते 2023 सालासाठी पुढील डॉक्टरांची सर्वानुमते सर्व 203 सदस्यांनी एकमताने निवड करण्यात आली अशी माहिती संस्थापक डॉ विनोद सातव पाटील यांनी दिली.
वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी डॉ सुनील गुप्ता, सचिवपदी डॉ ज्ञानेश्वर खरात, कोषपाल डॉ नितीन पवार, उपाध्यक्ष डॉ नारायण ताठे आणि डॉ प्रशांत मते, सहसचिव डॉ राहुल शिंदे, सहकोषपाल डॉ हेमंत विभुते तसेच विविध कमिटीवर विविध डॉक्टरांची निवड करण्यात आली.
सोशियल आणि सांस्कृतिक कमिटी - डॉ दाफिया चिंचणीकर, डॉ रश्मी मोदानी, डॉ संतोष सांगोले, डॉ अतुल जाधव, डॉ विशाल मोरे.
स्पोर्ट्स कमिटी- डॉ मच्छिंद्र काशीद, डॉ बंडू कराळे, डॉ शशिकांत निकम, डॉ विजय कुंभार.
मेडीकोलिगल कमिटी - डॉ भूषण विधाते, डॉ अमोल आजनकर, डॉ राहुल केंद्रे, डॉ रघुनाथ रामकर.
वुमेन्स फोरम - डॉ स्नेहा काशीद, डॉ सविता हेगडकर, डॉ आश्विनी पवार, डॉ रोहिणी मते.
असोसिएशनचे हे अकरावे वर्ष असून 203 सदस्यसंख्या आहे. असोसिएशनच्या माध्यमातून वेगवेगळे सिएमई, आरोग्यशिबिरे, डॉक्टर्स डे, स्पोर्ट्स व सांस्कृतिक कार्यक्रम, बोगस डॉक्टर पकडून देणे, सहली यांचे आयोजन केले जाते.