शिरुर दिनांक ( वार्ताहर )शासनाच्या लाडकी बहीण योजना संदर्भात विरोधक म्हणतात हा चुनावी जुमला आहे हा चुनावी जुमला नसून आजितदादाचा हा वादा व शब्द असल्याचे सांगून गरीबांना सक्षम करणारी ही योजना असल्याचे सांगत पवार यांनी विरोधकांना फटकारले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज शिरुर तालुक्यात आले असता वाढ्दिवसानिमित्त महागणपती मंदिरात आरती त्यांनी केली . शिरुर शहर व रांजणगाव येथे उस्फूर्त असे स्वागत पवार यांचे करण्यात आले . यावेळी उपस्थित महिला व युवती समवेत त्यांनी शासनाच्या महत्वाकांक्षी अश्या लाडकी बहीण योजनेविषयी चर्चा केली . यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे , शिरुर आंबेगाव राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर , शिरुर तालुकाध्यक्ष रवी काळे ,प्रदीप वळसे घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे , माजी सभापती प्रकाश पवार ,सविता बगाटे , शहराध्यक्ष शरद कालेवार आदी उपस्थित होते . पवार यावेळी बोलताना म्हणाले की वाढदिवसाच्या दिवशी घरी आईजवळ थांबून वाढदिवस साजरा करीत असतो . परंतु यंदाचा वाढदिवशी सकाळीच आईचा आशिर्वाद घेवून माता भगिनीना भेटण्यासाठी दौरावर निघालो आहे . अहमदनगर शहर , पारनेर , श्रीगोंदा , कर्जत याठिकाणी दौरानिमित्त जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही असे सांगून ते म्हणाले की या योजनेत गरीबांचा विचार करण्यात आला आहे . ही योजना नवीन असून योजनेचे फॉर्म भरुन फॉर्म भरुन घेण्यासाठी रांगा लागत आहे. जुलै महिन्यात या योजनेचे फॉर्म भरता आले नाही व ऑगस्ट महिन्यात जरी फॉर्म भरले तरी जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्याचे पैसे मिळतील असे पवार म्हणाले. या योजनेद्वारे ४५ हजार कोटी रुपये देण्यात येणार असून त्यामुळे बाजारपेठेत ही एवढी रक्कम येणार असल्याचे पवार म्हणाले . राज्यातील महायुतीचा शासनाने शेतकरी , महिला, युवकांसह समाजातील विविध घटकांसाठी चांगल्या योजना आणल्या आहेत . जातीय सलोख्या राहावा व शिव , शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा पुढे नेण्याचे काम करीत असून विकास हेच आमचे ध्येय असल्याचे पवार यांनी सांगितले . गरीब समाजाला वर आणण्यासाठी विविध कल्याणकारी योजना शासनाने आणल्या आहेत या योजना पुढे चालू राहण्यासाठी जनतेने आशिर्वाद व पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. शेतक-यांना दिवसा वीज मिळावी याकरीता साडे आठ हजार मेगावॅट वीज सोलर द्वारे देण्यात येणार असून शेतक-यांना यापुढे सोलर पंप देण्यात येणार आहे. तरुण तरुणीसाठी स्टायपेंट सुरु करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले . शिरुर तालुक्यातील चासकमानचे लायनिंगचे काम करण्यात येणार आहे लायनिंगचे काम केल्यामुळे पाणी वाया जाणार नाही असे ही ते म्हणाले .