शिरूर दिनांक ( वार्ताहर ) - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वाढदिवसानिमित्त पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या माईनगरी शिरूर येथील आश्रमाला सदीच्छ भेट देत वाढदिवस साजरा केला . उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी पद्मश्री सिंधुताई सपकाळ माई यांनी स्थापन केलेल्या शिरूर येथील अनाथ आश्रमाला सदिच्छा भेट देऊन आश्रमातील अनाथ,गरजू आणि निराधार विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारून त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा केला, तसेच आश्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांनी दादांचा सत्कार केला. पवार यांनी पद्मश्री सिंधुताई सपकाळ माईंचे कार्य आणि त्याग विद्यार्थ्यांना सांगून माईंविषयी आदर व्यक्त केला आणि संस्थेची माहिती जाणून घेतली . दादांनी अनाथ व गरजु मुलांबरोबर संवाद साधून संस्थेचे अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ यांना मुलांसाठी संस्थेला काहीही गरज पडल्यास निसंकोचपणे संपर्क करावा अश्या सूचना दिल्या. दादांनी दिलेल्या भेटी प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ,कार्यकारी अध्यक्ष यश सूर्यवंशी, प्रकल्प व्यवस्थापक सचिन ढोरमले, ,शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.