शिरुर दिनांक ( वार्ताहर ) आषाढी एकादशी निमित्त बुधवार दि. १७ जुलै २०२४ रोजी ध्यान मंदिर, विठ्ठलनगर, शिरुर येथे सकाळी ६.०० वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मुर्तीना पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमोल श्रीधर तांबे व त्यांच्या पत्नी उपजिल्हाधिकारी अर्चना अमोल तांबे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .तर सायंकाळी साडेसहा वाजता ह.भ.प. कु.सानिकाताई महाराज पाचर्णे यांचे किर्तन होणार असल्याची माहिती श्री. संत शिरोमणी सावता महाराज समाजसेवा  प्रतिष्ठान चे किरण बनकर यांनी दिली आहे . त्यांनी सांगितले की ध्यान मंदिरात एकादशीनिमित्त सकाळी ८.०० वा. : महाआरती होणार असू दुपारी २ ते ४ यवेळेत विठ्ठल नामाचा गजर । हरी भजन संगीत कार्यक्रम ध्यान मंदिर हरिपाठ भजनी मंडळ सादर करणार आहेत . तर सायंकाळी ४.३० ते ५.३० यावेकेत ह.भ.प. जनाबाई गायकवाड हरिप्रवचन करणार आहेत .सायं. ५.३० ते ६ वाजता हरिपाठ होणार असून सायंकाळी ६.०० वाजता महाआरती माजी सभापती सुजाता अशोक पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे . सायं. ६.३० वाजता ह.भ.प. सानिकाताई पाचर्णे यांचे किर्तन होणार  असून गायनाचार्य : ह.भ.प. संतोष महाराज चोपडे मृदंगाचार्य अनिल महाराज देशमुख व संतकृपा वारकरी शिक्षण संस्था, बेलवंडी फाटा त्यांना किर्तन साथ देणार आहेत .मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री. संत शिरोमणी सावता महाराज समाजसेवा प्रतिष्ठाण व ध्यान मंदीर व्यवस्थापन समिती, विठ्ठलनगर, शिरुर यांचा वतीने करण्यात आले आहे .