शिरुर दिनांक ( वार्ताहर )येथील आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम व विद्याधाम प्रशाला प्राथमिक शाळा येथे आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापिका अश्विनी घारू , प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका तृप्ती आगळे आणि अफसाना सय्यद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन पालखी पूजन व विठ्ठलाची आरती झाली. शाळेच्या पटांगणात ज्ञानोबा माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. चिमुकल्यांनी विठू नामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विठ्ठल रखुमाई,वारकरी, तुकाराम ज्ञानदेव निवृत्ती सोपान, मुक्ताई अशा वेगवेगळ्या पोशाखातील विद्यार्थ्यांनी परिसरात काढलेली दिंडी आणि विठू माऊलीचा जयघोष यामुळे चैतन्य उतरले होते. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका अश्विनी घारू यांच्या 'माझी वारी' या काव्य वाचनाने झाली. यावेळी सर्वजण भारावून गेले. ' चल ग सखे,' ' माऊली माऊली ' या गाण्यांवर चिमुकल्यांनी ठेका धरला. तसेच टाळ मृदुंग वाजवी हरिनामाच्या गजरात विठुरायाची नगरी विठ्ठल विठ्ठल या गाण्यावर नृत्य केले. इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी पाण्याचे महत्व सांगणाऱ्या भारुडाचे सादरीकरण केले. शिक्षिकांद्वारे 'रखुमाई रखुमाई' या गाण्यावर केलेले नृत्याचे सादरीकरण केले . विद्याधाम प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती मुळे तसेच माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय शेळके आणि देशपांडे सर उपस्थित होते.शाळेचे चेअरमन अनिल बोरा , सचिव नंदकुमार निकम तसेच शालेय समितीचे सदस्य धरमचंद फुलफगर यांनी या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता प्रीती सोनवणे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. दरम्यान विद्याधाम प्रशाला प्राथमिक विभागाचा वतीने ही आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळाचे आयोजन करण्यात आले होते . ज्ञानोबा माउली तुकाराम च्या गजरात बाल वारकरी सह पालखी यावेळी काढण्यात आली . सांस्कृतिक कार्यक्रमांचे ही यावेळी आयोजन करण्यात आले होते अशी माहिती ज्योती मुळे यांनी दिली .यावेळी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष कल्याण आमटे , बालवाडी विभागाच्या शशिकला सांगळे , शिक्षीका रोहीणी मापारी , छाया चव्हाण , कांचन वाघ , कल्पना वाघमारे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन सीमा पाचर्णे यांनी केले .