शिरूर दिनांक ( वार्ताहर) चातुर्मासनिमित्त जैन धर्मगुरू प.पू.साध्वीजी प्रियमरसाश्रीजी व प.पू.साध्वी श्रियमरसाश्रीजी यांचे शिरूर शहरात मिरवणूक द्वारे भव्य असे स्वागत करण्यात आले. रामलिंग रस्त्यावरील आनंद सोसायटी येथून मिरवणुकीस सुरुवात झाली . यावेळी आमदार अशोक पवार, प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल, संघपती भरत चोरडिया, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे, गोडीजी पार्श्वनाथ टेंपलचे विश्वस्त सतीश धाडीवाल, अभयकुमार बरमेचा , गोरक्षण पांजरापोळचे प्रकाश कोठारी, व्यापारी महासंघाचे सुरेश बोरा, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक धरमचंद फुलफगर, तिलोक जैन पारमार्थिक संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गादिया, महामंत्री वसंत गादिया, सुभाष गांधी, यांचासह वाय.एम.ग्रुपचे अतुल बोथरा, अजय चोरडिया, यांच्या सह पुणे, रोहा,अहमदनगर,तळेगाव दाभाडे,पाली, महाड, मुंबई,येथून आलेले जैन संघ उपस्थित होते. मिरवणुकीच्या सर्वात पुढे अहमदनगर येथील स्वामी समर्थ ब्रास बॅ न्ड होता. मिरवणुकीत महिला मंगल कलश घेवून सहभागी झाल्या होत्या. गुरु महराजांच्या व भगवान महावीर स्वामीच्या जयघोष यावेळी करण्यात येत होता. जैन धर्माची पताका व झेंडे काहीच्या हातात होते. ही मिरवणूक रामलिंग रस्त्याने शहरातील आडत बाजार मार्गे कापड बाजार येथील जैन स्थानकात पोहोचली. मिरवणुकीचे ठिकठीकाणी उस्फुर्त स्वागत करण्यात आले. जैन स्थानका जवळ मिरवणुकीची सांगता झाली. सांगते नंतर श्री .प्रियमरसाश्रीजी व श्रियमरसाश्रीजी यांचे प्रवचन झाले. यावेळी  सूत्रसंचालन माजी नगरसेवक विजय दुगड यांनी केले. स्वागत उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी केले. यावेळी मनसुखलालजी जसराजजी धाडीवाल यांच्या परिवाराचा वतीने गौतमीप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.