शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर नगरपरिषदेचा वतीने सिध्दीचा पहाड येथे सुमारे साडेपाच हजार झाडे मियावाकी पध्दतीने लावून  हा सर्व भाग घनदाट झाडांचा व गर्द हिरवा करण्यात येणार आहे . शिरुर नगरपरिषदेचा वतीने शहरातील सिध्दीचा पहाड येथे सुमारे ५५०० झाडांचे मियावाकी पध्द्तीने झाडे लावण्याचा उपक्रमास सुरुवात झाली . यावेळी आमदार ॲड .अशोक पवार ,प्रसिध्द उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल , मुख्याधिकारी स्मिता काळे , शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार , कृषीलोक विकास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक , माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे , वनीकरण विभागाचे एस . एस. भूते , मियावाकी विषयातील तज्ञ आकाश निकम ,सिध्देश्वर वनीकरण समितीचे डॉ . राजेंद्र ढमढेरे , तुषार वेताळ , तांबोळी सर , लक्ष्मण डोके , सिध्देश्वर बगाडे , संतोष वाळके , वात्सलय सिंधु संस्थेच्या उषा वाखारे , आरपीयआयचे शहराध्यक्ष नीलेश जाधव , भुगोल विभागाचे माजी प्रमुख प्रा .चंद्रकांत धापटे , पालिकेचे कार्यालयीन प्रमुख राहूल पिसाळ , पकंज काकड , स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे , भूषण कडेकर , यांच्या सह विविध विभागाचे विभागप्रमुख शिक्षण मंडळाचे माजी सदस्य प्रशांत शिंदे , किरण बनकर , यांच्यासह विविध शाळांमधील शिक्षक , सामाजिक संघटना , स्वंयसेवी संस्था यांचे प्रतिनिधी व पर्यावरणप्रेमी नागरीक उपस्थित होते . यावेळी बोलताना मुख्याधिकारी काळे म्हणाल्या की पर्यावरण संवर्धन व पर्यावरण वाचविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे . स्वच्छ व हरित शिरुर साठी नगरपरिषद विविध उपक्रम राबवित आहे . सिध्दीचा पहाड येथे मियावाकी पध्दतीने ही झाडे लावण्यात येत आहे . या मियावाकी पदध्तीने वृक्षारोपन करण्याची तयारी मागील दोन महिन्यापासून करण्यात येत होती . सिध्दीचा पहाडावरील २५ गुंठे जागेत सुमारे साडेपाच हजार झाडे लावून छोटे जंगळ उभे केले जात आहे. जैवविविधतेची दृष्टीने विविध प्रकारचे फळ झाडे , फुल झाडे व देशी झाडे लावण्यात आली आहेत .मियावाकी पध्द्तीत वृक्षाची लागवड जवळ जवळ केली जाते .त्यातून वृक्ष वाढीस मोठ्या फायदा होतो ज्या ठिकाणी ही झाडे लावण्यात आली त्याठिकाणी झाडे लावण्यापूर्वी शेणखत , कोकोपेट , व पोयटा टाकण्यात आला . त्याच बरोबर बारामती येथे मियावकी पध्द्तीने लावण्यात झाडडांच्या ठिकाणी शिरुर नगरपरिषदेच्या आधिका-यांनी भेट देवून यासंदर्भातील माहिती व मार्गदर्शन घेतले बारामती येथील या विषयातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर येथील काम सुरु करण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले . ज्या ठिकाणी झाडे लावण्यात येणार आहे . त्या ठिकाणच्या जागेला संरक्षक कपाउंड करण्यात येणार असून ठिंबक सिंचनादवारे झाडांना पाणी देण्यात येणार आहे . आज ( १६ जुलै ) आणि उद्या १७ जुलै असा दोन दिवस वृक्षलागवड याठिकाणी करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले . शिरुरचे तापमान वाढत आहे. त्याचा परिणाम जमिनीची धूप वाढण्यात होत आहे. पाण्याची पातळी घटत आहे . शहराचे क्षेत्रफळ कमी आहे . इमारती व घरे व अन्य बाबीच्या तुलनेत शहरात झाडांची संख्या कमी आहे . यासर्वांचा परिणाम हवामान, नदी व परिसंस्थे वर होत आहे . या सर्वांन संदर्भात शिरुरकरांमध्ये जागृती झाली पाहीजे. नदी स्वच्छ राहण्यासाठी नदी मध्ये कचरा टाकला जाणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असून शहरातील घोडनदी स्वच्छ ठेवण्यासाठी व सुधार साठी लोकसहभाग महत्वाचा असून याबाबत प्रयत्न केले जात असल्याचे काळे यांनी सांगितले . 

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

              चौकट

 सिध्दीचा पहाड येथे मियावाकी पध्द्तीने लावलेल्या झाडांमध्ये करवंद , कागदी लिंबू , बोर , आवळा ,उंबर ,पेरु , सीताफळ , रामफळ ,जांभूळ , चिकू , चिंच , फणस , भोकर , हमुमान फळ , रुद्राक्ष फळ , मोर आवळा , अंजीर , पपई , ही फळ झाडे तर फूलझाडा मध्ये रातराणी , कामिनी , कांचन , प्राजक्त , ताम्हण , मोगरा , सोनचाफा , बहावा , रान गुलाब , हिरवा चाफा , ही फूलझाडे तर वॉटरशेड मध्ये बेल , करंज , बेहडा , कदंब , सागवान , तुती , अंजन , मोह , बदाम ही झाडे तर आयुर्वेदिक असणारी आपटा , अर्जून , कडीपत्ता , हादगा , खैर , मेहंदी , हिरडा , पळस , काटेसावर , अडुलसा ,रिठा , शिवण , शामी , संकेश्वर , जास्वंद , गुळभेंडी , आनंता, मुचकुंद , दिनका राजा , तगर, जुई , कागडा , गुलाब ही झाडे तर वूडन मध्ये शिसम , मोहगणी , पिंपळ ,बकुळ , कडूलिंब , वड , चंदन , नांदृक , कैलासपती , गुळगुळ , वावळ , रक्तचंदन असे एकूण ७२ वृक्ष प्रकारचे 5170 झाडे लावण्यात आली आहेत .