कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
" भारत माता कीजय " जय हिंद च्या जयघोषात कोरेगाव भीमा येथे छत्रपती संभाजी हायस्कूल व शिक्रापूर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरी मध्ये विद्यार्थी, पोलीस व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी विद्यालयात प्राचार्य माणिक तुळशीराम कुंभारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य व विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन बबुशा ढेरंगे, महादेव सोपान फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस नाईक हेमंत कुंजीर, आत्माराम तळोले, पोलीस अंमलदार अविनाश पठारे, अशोक केदार उपस्थित होते.
नेहा राजू गिरी या विद्यार्थीनीने परेड कमांडर म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पलता गिरी यांनी केले. तर आभार शरयू कांबळे यांनी मानले.