जानेवारी 2021आदरणीय मेटे सहेबनी मराठा आरक्षण चा निर्णय झाल्या शिवाय नौकर भरती हाऊ देणार नाही आशी भुमिका घेतली होती, त्याचे संपुर्ण महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पडसाद ऊमठले होते.
त्याची परिनिती म्हणून बीड जिल्ह्यातील obc, दलीत SBC आणि इतर समाजातील जवळपास 200 विद्यार्थी माझ्याकडे आले,अतिशय आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी मेटे साहेबांची गाडी माझ्या कार्यालयासमोर अडवण्याचे नियोजन केले होते ,
ही गोष्ट मेटे साहेबाला कळतात मेटे साहेबांनी स्वतः फोन करुण त्यांच्या कार्यालयावरती विद्यार्थ्यासह मला बोलून घेतले, प्रचंड आक्रमक झालेले विद्यार्थी यांच्या रोशाला मेटे साहेब स्वतःहून सामोरे गेले.
आम्ही आमच्या समूहातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याबद्दलची भूमिका आक्रमकपणे मेटे साहेबांसमोर मांडली, तेवढयाच शांततेत त्यांनी त्यांची त्यांच्यासमूहातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची भूमिका आम्हाला सर्वांना समजून सांगून 31 मार्च 2021 च्या अगोदर जर मराठा आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर मी नोकर भरतीच्या बाबतीत काही बोलणार नाही असा शब्द दिला.
मिटे साहेब सोबत आमच्या हक्कासाठी भांडण्यास गेलेल्या आम्हाला सर्वांना साहेबांनी चहापाणी करून परत पाठवले.एवढ्या मोठ्या मनाचा नेता आज बीड जिल्ह्याने गमावला या गोष्टीचे प्रचंड दुःख होत आहे .