शिरुर :( वार्ताहर )  येथील  डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूर मध्ये कवी कालिदास जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा संस्कृत कवी कालिदास यांचा जन्मदिवस म्हणून करण्यात येतो. या निमित्ताने शिरूर येथील डेक्कन स्कूल मध्ये सरस्वती व कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ समीर ओंकार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांनी संस्कृत सुभाषिते व त्यांचा मराठी अर्थ विशद केला.  ओंकार यांनी संस्कृत भाषेत मनोगत व्यक्त केले. त्यांनी कवी कालिदास यांनी लिहिलेल्या शाकुंतल, कुमारसंभव, मेघदूत , रघुवंश आदी साहित्याचा मागोवा घेतला. शाळेतील शिक्षक  सखाराम पुरी यांनी संस्कृत भाषेत सूत्रसंचालन केले.