शिरुर दिनांक ( वार्ताहर ) अपहरण , खंडणी व मारहाण प्रकरणी दोन जणांच्या सह अन्य साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक जणास जेरबंद करत आले आहे तर एक जण पळून गेला आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 1) योगेश बारवकर रा. शिरुर, ता. शिरूर, जि.पुणे (2) विनोद राजेंद्र चाबुकस्वार रा. शिरुर, सुरजनगर, ता.शिरुर, जि.पुणे व त्यांचे अनोळखी इतर पाच साथीदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . विनोद चाबुकस्वार यास पोलीसांनी अटक केली आहे . तर योगेश बारवकर हा पळून गेला आहे . याबाबत संतोष मनमोहन बेहरा वय 19 वर्षे, व्यवसाय नोकरी, सध्या रा. ढोकसांगवी, व्हिल्स इंडियाचे पाठीमागे, सुरेश नागवडे यांचे खोलीत, ता. शिरूर, जि. पुणे. मुळ रा. समरपुर, ता. अहलापुर, जि. जसपुर, राज्य- उडीसा, यांनी फिर्याद दिली आहे . ही घटना दिनांक ६ जुलै 2024 रोजी साडेसात ते साडेअकराचा वा.चे दरम्यान ढोकसांगवी तील पाचंगेवस्ती, ता. शिरूर, जि.पुणे येथे घडली . फिर्यादी संतोष बेहरा व त्याचे मित्र संतोष बसंत बेहरा, सुदर्शन नबगन बेहरा, संतोष सुरेंद्र परिडा असे चौघांना योगेश बारवकर रा. शिरुर याने त्याच्या अनोळखी पाच साथीदारांसह त्यांच्या कडील स्कुटी, प्लॅटिना व पल्सर मोटार सायकलवरुन येवुन जबरदस्तीने मारहाण केली व त्यांचेकडील तिन्ही मोटार सायकलवरून अपहरण करुन चौघांना कारेगावचे हद्दीतील इंडीयन ऑईल पेट्रोल पंपासमोरील रोहन मार्बल्स दुकानाच्या पाठीमागील चार मजली इमारतीमधील तिस-या मजल्यावरील एका खोलीमध्ये नेले व प्लॅस्टिकच्या पाईपाने, कंबरेच्या बेल्टने मारहाण केली. व "तुम्हाला जिवंत राहायचे असेल तर, प्रत्येकाने 25,000 रु. द्या" असे सांगीतले फिर्यादी बेहरा तसेच संतोष बसंत बेहरा, सुदर्शन नबगन बेहरा असे तिघांच्या नातेवाईकांनी त्यांचे मोबाईलवरती फोन पे द्वारे पैसे पाठविल्यावर तिघांचे एकुण 75,000/रु.ची खंडणी योगेश बारवकर याने त्याच्या सोबतच्या व्यक्तीच्या मोबाईलवरील स्कॅनरवरुन घेतली. तसेच रात्री साडेअकराचा सुमारास संतोष परिडा याचे पैसे घेण्यासाठी फिर्यादीचा भाऊ मानस बेहरा याच्याकडे कारेगाव चौकातील, कारेश्वर मंदिर येथे योगेश बारवकर हा त्याचा साथीदार विनोद राजेंद्र चाबुकस्वार याच्याकडील पांढ-या रंगाच्या टाटा अल्ट्रोज गाडी क्र एम एच -12 व्ही . सी 4879 हि मध्ये फिर्यादी व त्याचे दोन मित्रांना घेवुन आला असता त्यांना पोलीसांनी पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी योगेश बारवकर हा त्या ठिकाणावरुन पळुन गेला . यासंदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे करीत आहेत