शिरुर दिनांक ( वार्ताहर )- येथील चांदमल ताराचंद बोरा महविद्यालयास नॅकची ऐ प्लस श्रेणी मिळाल्याबद्दल आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी प्रसिध्द उद्योगपती व चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयीन नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारीवाल , शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम , सद्स्य धरमचंद फुलफगर , प्रकाश बोरा , शिरीष बरमेचा , राजेंद्र भटेवरा , राजेंद्र दुगड , शिरीष गादिया ,उद्योजक प्रकाश कुतवळ ,गीताराम कदम , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे , मावळाई प्रकाशनचे डॉ . सुभाष गवारी , प्रा . चंद्रकांत धापटे , प्रा . डॉ . पी . एस . वीरकर आदी उपस्थित होते . प्रकाश धारीवाल यावेळी बोलताना म्हणाले की बोरा महविद्यालयास नॅकची ऐ श्रेणी मिळाली त्यात महाविद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थी यांचे मोठे योगदान आहे. आपल्या आयुष्याला आकार देण्यात शिक्षक गुरुजन वर्गाचा मोठा वाटा असतो . या सर्वांविषयी आदराची व कृतज्ञतेची भावना असायला हवी . शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाने कधीही गुणवत्तेशी तडजोड केली नाही .संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्य करीत आहेत. समर्पित भावनेने काम करणारे प्रामाणिक व गुणवान शिक्षक व त्याच्या पाठीशी उभे राहणारे संस्थाचालक यामुळे संस्थेचा नावलौकिक वाढत आहे . संस्थे द्वारे आगामी काळात लॉ कॉलेज सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले . सचिव नंदकुमार निकम म्हणाले की बोरा महाविद्यालयात १२ विषयाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जात असून ७ विभागाची पीएचडी संशोधन केंद्र आहेत .संशोधनक्षेत्रात ही बोरा महाविद्यालय कार्यरत असून विविध बदलांना सामोरे जात महाविद्यालयाने प्रगती केली आहे . महाविद्यालयाचा नॅकची ऐ श्रेणी पर्यत झालेल्या प्रवास त्यांनी सांगितला . प्राचार्य डॉ . के . सी मोहिते यावेळी म्हणाले की महाविद्यालयाने ५० वर्ष पूर्ण केले असून शैक्षणिक गुणवत्तेचा दृष्टीने महत्वाचे असणारे बोरा कॉलेज आहे .महाविद्यालयातील विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती त्यांनी दिली .भविष्यात ॲटोमनीचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला . कौशल्य विकास , संशोधन याकरिता ही विशेष लक्ष देण्यात येईल असे ते म्हणाले . उद्योजक प्रकाश कुतवळ व धरमचंद फुलफगर यांची ही मनोगते यावेळी झाली . नॅकच्या संपुर्ण कामाची माहिती डॉ. पद्माकर प्रभूणे व प्रा . डॉ भोईटे यांनी दिली . सुत्रसंचालन प्रा.डॉ . .क्रांती पैठणकर ( गोसावी ) व प्रा. डॉ .ईश्वर पवार यांनी केले . उपप्राचार्य हरिदास जाधव यांनी आभार मानले .