ढोलताशांचा आवाज फटाक्यांची आतिषबाजी टाळ मृदंगाच्या निनदाने पाटोदाशहर भक्तीमय
पाटोदा (गणेश शेवाळे) ढोलताशांच्या आकर्षक टाळ मृदंगाच्या निनदाने "संत भगवान बाबाकी जय"च्या गगनभेदी घोषणा, फटाक्यांची जोरदार आतषबाजी आणि बघावे तिकडे तिरंगा व भगवे ध्वज अशा उत्साही व मंगलमय वातावरणात संत भगवान बाबा जयंती निमित्त शहरात काढलेल्या भव्यदिव्य मिरवणूकीने पाटोदा शहर भक्ती मय झाले होते संत भगवान बाबा जयंतीचे नागरिकांनी ठिक ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले.संत भगवान बाबा जयंती निमित्त आज शहरात भव्य दिव्य अशी मरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विविध मान्यवराच्या हस्ते संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ढोल ताशांचा निनाद आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मरवणूकीला सुरवात झाली.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन सुरू झालेली ही मिरवणूक,डॉ बाबासाहेब आबेडकर चौक,अण्णाभाऊ साठे चौक मार्ग जावून संत भगवान बाबा चौकात मिरवणूकीचे विसर्जन झाले यानंतर नगरपंचायत प्रणांगणात संत भगवान बाबा जयंती उत्सव समिती यांच्या वतीने संत भगवान बाबा फोटो पुष्पहार आणि आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन श्री संत भगवान बाबा गौरव पुरस्काराने ह.भ.प ईंदुरीकर महाराज,बीड जिल्ह्याच्या खा.डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे,पद्मश्री शब्बीर मामु व संत ह.भ.प राधाताई सानप, सामाजिक कार्यक्रते दत्ता बारगजे, शेद्रिय शेतीतज्ञ सत्यजित हांगे यांना देऊन
गौरव करण्यात आले यानंतर निवृत्ती महाराज इंदुरेकर यांचे हारिकिर्तन झाले ह्या कार्यक्रमास खासदार प्रितमताई मुंडे,युवानेते जयदत्त धस,यांच्यासह प्राध्यापक, वकील, शिक्षक,डॉक्टर्स, व्यापारी,विविध सामाजिक कार्यकर्ते व संत भगवान बाबा प्रेमी हाजारो भक्त उपस्थित होते