बीड- 

पाटोदा मांजर सुंभा रोडवरील बामदळे वस्ती जवळ स्विफ्ट डिजायर क्रमांक एम.एच.१२के.एन ९७६१ व आयशर टेम्पो क्रमांक एम.एच.२६ बी.ई.५९४५ चा अपघात झाला असून आयशर टँम्पो व डिवायडरच्या मध्ये स्विफ्ट अडकलेली होती गाडीमधील लहान मुला सह ६ जन जागीच ठार झाले आहेत पुणे येथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी जीवाची वाडी तालुका केज येथे जात असताना पाटोदा शहराजवळील बामदळे वस्ती येथे सकाळी सातच्या दरम्यान मांजरसुंभाच्या देशेने येणाऱ्या आयशर टेम्पो व पुणे येथून येणाऱ्या स्विफ्ट कारचा अपघात झाला असुन सहा जण ठार झाले आहेत. अपघात एवढा मोठा होता की आयशर टेम्पो व डिवायडर मध्ये स्विफ्ट कार घुसल्याने स्विफ्ट कार काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली गाडीमध्ये अक्षरश शरीराचा चंदामेंदा झालेला होता 

 घटनास्थळी पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पोलीस हजर झाले होते व सर्वांनी मिळून मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली आहे.