शिरुर दिनांक ( वार्ताहर )सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूरच्या द्वितीय वर्षाचा निकाल १००% लागला आहे . माजी गृहराज्यमंत्री स्वर्गिय बापूसाहेब थिटे यांच्या प्रेरणेतून सन 1995 मध्ये सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजची स्थापना झाली . कॉलेजला स्पर्श सेवाभावी संस्था अहमदनगर यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार 2024 ने गौरविण्यात आले होते. याच कॉलेजच्या डी फार्मसी च्या प्रथम वर्षाचा निकाल 96.87% व द्वितीय वर्षाचा निकाल 100% टक्के लागला या परीक्षेत प्रथम वर्ष डी फार्मसी मध्ये दौंडकर साक्षी 84.10 %, मुकडे वैष्णवी 81.10 %, लगड अपर्णा 80.60 %, व द्वितिय वर्षात राक्षे अनुष्का 87.36%, गवळी काजल 86.27%, वाफारे स्वाती व इनामदार सलमा 85.91%, यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे डी. फार्मसी चे प्राचार्य डॉ . अमोल शहा प्रा. निवेदिता केसकर, प्रा. हेमांगी झिंजुर्के, . प्रा. विशाल कारखिले , प्रा. मानसी गरदरे, प्रा.निखिल , प्रा. आरती शिंदे, प्रा. स्नेहा थिटे आदीनी अभिनंदन केले.