शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर तालुक्यात जुन महिन्यात पडणा -या पाउसाची सरासरी ९० मि.मी. असते . यंदाचा वर्षी पाउसाने ही सरासरी ओलांडली असून पाउस मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १९ जून अखेरीस पर्यत १२३ मिली पाउस झाला असल्याचे तालुका कुषि आधिकारी सिध्देश ढवळे यांनी सांगितले . मे मध्ये सरासरी १७मि.मी. पाउस झाला . जून महिन्यात शिरुर तालुक्यात सरासरी ९० मिमी पाउस पडतो . तालुक्यात १९ जून २०२४ अखेर पर्यत १२३ मि,मी .पाउस झाला आहे मागील वर्षी जून मध्ये पाउसाने सरासरी गाठली नव्हती त्यामुळे खरीपाच्या पेरण्या कमी झाल्या होत्या. ५८% एवढ्या पेरण्या झाल्या होत्या. यंदाच्या वर्षी २४ जून २०२४ अखेर पर्यत ६०% हून आधिक खरीपाच्या पेरण्या झाल्या असल्याचे तालुका कृषि आधिकारी सिध्देश ढवळे यांनी सांगितले . २१ जून 2024 अखेर तालुक्यात 6840 हेक्टर वर बाजरीची, 5078 हेक्टर वर मूगाची , 223 हेक्टरवर उडीदाची 422 हेक्टरवर मकाची ,4130 हेक्टर वर उसाची तर 2100 हेक्टर वर सोयाबीनची तर 300 हेक्टर वर कापसाची पेरणी करण्यात आली आहे . शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयातील नोंदी नुसार जून महिन्यात विविध मंडल विभागात पडलेल्या पाउसाचे प्रमाण पुढील प्रमाणे दिनांक ९ जून टाकळी हाजी मंडल मध्ये ५ मिमी , १० जून रोजी १३ मिमी, १२ जून रोजी १४ मिमी,तर १३ जून रोजी ८ मिमी पाउस पडला. वडगाव रासाई मंडल मध्ये ६ जून रोजी १८ मिमी, ७ जून रोजी १२ मिमी, ९ जून रोजी २८ तर १० जून रोजी १७ मिमी, तर १३ जूनला ७ मिमी पाउस पडला. न्हावरे मंडल मध्ये ६ जून रोजी ३ मिमी, ९ जून रोजी ३१ मिमी, १० जूनला ४० मिमी ,तर १३ जूनला २९ मिमी पाऊस पडला. मलठण मंडल मध्ये ७ जून ला ९ मिमी, ९ जूनला २४ मिमी तर तर १० जूनला ३५ व १२ जूनला ३०मिमी पाउस पडला, तळेगाव मंडल मध्ये मध्ये १० जूनला ३६ मिमी, ११जुनला १० मिमी पाउस पडला. रांजणगाव मंडल मध्ये १० जून ला १५ मिमी, १२जूनला २० मिमी तर १३ जूनला ३० मिमी पाउस पडला. शिरूर मंडल मध्ये १० जून रोजी ६० मिमी तर १३ जूनला २९ मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. कोरेगाव मंडल मध्ये ६ जूनला ४० मिमी, ९ जूनला ९६ मिमी, तर ११ जूनला १८ मिमी पाउसाची नोंद झाली आहे. पाबळ मंडल मध्ये ९ जूनला २५ मिमी, ११जुनला २१ मिमी, तर तर १४ जूनला १८ मिमी पाउसाची नोंद झाली आहे. २६ जून अखेर तालुक्यातील ५ गावात पाण्याचे १७ टॅकर अद्याप ही चालू असून २ गावातील टॅकर बंद करण्यात आले असल्याची माहिती पंचायत समिती कार्यालयातून देण्यात आली .