सिध्देश्वर मठपती-नांदेड प्रतिनिधी.
धर्माबाद नगर परिषद सभागृहात दिनांक २६ जून रोजी आयोजीत जनता दरबारात आमदार राजेश पवार यांनी धर्माबाद मधील आवश्यक असलेल्या विकासात्मक कामांबाबतीत जनतेकडून अपेक्षा जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला.
सदरील कार्यक्रमात पत्रकारांचे प्रतिनिधि म्हणून बोलतांना जेष्ठ पत्रकार तथा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक जी पी मिसाळे सर यांनी धर्माबाद तालुक्यात रोजगार वाढावे, नविन उद्योग धंदे यावेत ही सार्वजनिक विकासाची अपेक्षा व्यक्त करीत उमरी तालुक्यात जेष्ठ शेतकरी नेते मारोतीराव कवळे गुरूजी यांनी साखर कारखाना, पतसंस्था, दुग्ध व्यवसाय उभे करून रोजगार वाढवले तसे धर्माबाद तालुक्यात का होत नाहीत असे मत मांडले.
नेमकी हीच बाब आमदार राजेश पवार यांच्या अपयशाची ठरणारी दिसताच त्यांच्या पत्नी तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ग्रामीण सौ.पूनम राजेश पवार यांनी तुम्ही सुपारी घेऊन बोलत आहात का असे म्हणत जेष्ठ पत्रकार जी ,पी, मिसाळे यांचा अवमान करणारे वक्तव्य केले.
जनता दरबारात विकासात्मक विषयावर बोलणारे जेष्ठ पत्रकार जी ,पी,मिसाळे यांचा झालेल्या अपमाना बद्दल सर्व पत्रकारांनी जाहीर निषेध करून उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, व पोलीस निरीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे.
सौ पूनम पवार यांनी सर्व पत्रकारांची जाहीर माफी मागावी अशी प्रतिक्रिया यावेळी निवेदनात नमूद करण्यात आली.सर्व धर्माबाद तालुक्यातील पत्रकार मराठी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण तुरेराव, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पोतन्ना लखमावाड,युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान कांबळे, धर्माबाद पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबुराव पाटील,प्रेस संपादक संघाचे अध्यक्ष सतिश पाटील, संपादक विष्णुपुरी एक्सप्रेस मनोज बुंदेले, संपादक आपलं नांदेड शिवराज पाटील गाडीवान, जेष्ठ पत्रकार कृष्णा तिम्मापुरे, गंगाधर धडेकर,सुरेश गाळे, व्यंकटराव डोईवाड, सुधाकर जाधव, सुदर्शन वाघमारे, गणेश वाघमारे, गणेश पाटील हातनुरे, बाबुराव गोणारकर, गजानन वाघमारे, गणपत जटाळकर, सूर्यकांत गिरमाजी, लक्ष्मण येताळे, गजानन चंदापुरे, सौ मीना भद्रे, सिद्धेश्वर मठपती, माधव हनमंते, किशन कांबळे, राहुल वाघमारे, गजानन कुलकर्णी, लालजी ईमनेलू, स्वामी सोमेश, अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते.