शिरुर दिनांक (वार्ताहर ) गुरुजनांच्या सन्मान करण्याबरोबर व त्याच्याविषयी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्या सोबतच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी मदतीचा हात विद्याधाम प्रशालेच्या ९३ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी दिल्याने माणूसकी प्रधान व संवेदनशील विद्यार्थ्याची पिढी घडविल्याचा आनंद , कृतार्थता व समाधानाचे भाव गृरुजनांच्या चेहरावर झळकले . विद्याधाम प्रशालेच्या सन १९९३ च्या दहावीच्या विद्यार्थ्यानी शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले होते. या कार्यक्रमात दहावीच्या तुकडीला शिकविणा- या शिक्षकांच्या सन्मान करण्याबरोबरच या शिक्षकांची धान्यतुला करुन धान्यतुलेतून संकलित झालेले सुमारे १० पोती गहू व तांदळाची पोती शहरातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या मनशांती छात्रालय संस्था शिरुर व माहेर संस्था व अंध अपंगाची टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर येथील संस्थेला देण्यात आली . येथील विद्याधाम प्रशालेच्या सन १९९३ च्या बॅचच्या वतीने गुरुजन कृतज्ञता सन्मान सोहळा व स्नेहमेळावाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ३० वर्षानंतर विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटले. विविध क्षेत्रात कार्यरत असणारे विद्यार्थी पाहून शिक्षकांच्या चेह-यावर समाधान व आभिमानाचा भाव निर्माण झाला . आपल्या विद्यार्थ्यांनी धान्यतुला करुन केलेल्या सन्मान व धान्यतुलेतुन संकलित झालेले धान्य समाजातील वंचित घटकांकरिता कार्यरत असणा-या संस्थाना आमच्या हस्ते वितरित करण्यात आले . हा आम्हा शिक्षकांच्या आयुष्यातील अविस्मरणीय सुवर्णक्षण असून आम्ही सर्व या सन्मानाने कृतार्थ झालो अश्या भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या. या सन्मान सोहळाकरीता शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव तु . म . परदेशी , पुण्याहुन घ . वा . करंदीकर , किशोर बालटे , विद्याधर पोटे तर बारामती हून अब्दुल रज्जाक पठाण आले होते . योगेश जैन , धनाजी खरमाटे ,व्ही . डी . कुलकर्णी , दादाभाउ उदमले , राजमोहम्मद शेख , इंदुमती इसवे , , बाळासाहेब गायकवाड , विठ्ठल पडवळ , रतनकुमार चौथे , अनिल तांबोळी, लक्ष्मीनारायण सारडा सतीश राठौड , सुभाष वेताळ, गिरीष मुळे , अशोक आहेर , सेवक नंदु कु-हे हे शिक्षक उपस्थित होते . यासर्व शिक्षकांची समारंभ व सन्मानपुर्वक धान्यतुला करण्यात आली . याप्रसंगी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव तुलसीराम परदेशी , घनश्याम करंदीकर ,व्ही . डी कुलकर्णी , सुभाष वेताळ , योगेश जैन , अनिल तांबोळी , यांनी केले . यावेळी माजी सचिव व प्रशालेचे माजी मुख्याध्यापक तुलसीराम परदेशी म्हणाले की तुम्ही खूप मोठे व्हा , तुमच्या कार्यकर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे . धान्यतुलेने केलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली . हिंदीचे माजी शिक्षक अब्दुलरज्जाक पठाण यांनी धान्यतुला करुन केलेल्या सन्मानाबद्दल स्वरचित कविते द्वारे भावना प्रगट केल्या त्या कवितेस उस्फूर्त दाद मिळाली . यावेळी माजी मुख्याध्यापक घनश्याम करंदीकर , अनिल तांबोळी , विठ्ठल पडवळ ,मनशांती छात्रालयाचे विनायक सपकाळ आदीनी मनोगत व्यक्त केली . तर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने अतुल बोथरा , ॲड .वीरेंद्र सावंत , डॉ .रीना बोरा , तुषार दळवी , मनिषा लांडे , अजित मोरे यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा .सतीश धुमाळ यांनी केले .सूत्रसंचालन अनिता भोगावडे यांनी केले . शिक्षक परीचय विनय संघवी व विद्या वाघमारे यांनी करुन दिला . प्रतिज्ञा व प्रार्थना स्वाती थोरात यांनी म्हटली . वर्षा काळे यांनी आभार मानले . पसायदान डॉ . रीना बोरा व अनिता भोगावडे यांनी सादर केले . गुरुजन कृतज्ञता सोहळासाठी विद्याधाम प्रशालेच्या इयत्ता दहावीच्या सन १९९३ च्या बॅचचे ८० हून आधिक विद्यार्थी हजर होते. अनेक वर्षा पासून आपल्या ९३ च्या बॅचच्या वतीने गुरुजन कृतज्ञता सोहळा व्हावा या बाबत चर्चा होत . त्यानुसार कल्पना- संकल्पना मांडल्या जात होत्या. या सगळ्याला खरी गती मिळाली ती मागील महिन्यात . सन १९९३ च्या इयत्ता दहावीच्या बॅचला शिकविणारे व आता सेवानिवृत्त झालेल्या सर्व शिक्षकांना शोधण , त्याच्या मोबाईल नंबर मिळविणे ,त्यांना एकत्र आणणं,कृतज्ञता सोहळाचे आयोजन करण , त्याकरीता आवश्यक आणि ऐच्छिक वर्गणी गोळा करणे , यांसारखी महत्वाची कामे स्वंत :हून काही मित्र मैत्रीण यांनी उत्साहानं पार पाडली. या कामात सतीश धुमाळ, अतुल बोथरा , वर्षा काळे ,प्रशांत थोरात , विनोद बोथरा , मुकेश संघवी स्वाती थोरात , चंद्रकांत कनिंगध्वज ,सचिन शेळके ,विनोद बोथरा ,गणेश खोले , राजू लोखंडे , सुरेखा चिकणे , संतोष नवले , विनय संघवी यांनी विशेष पुढाकार घेतला . माजी शिक्षकांनी आवर्जून गुरुजन कृतज्ञता सोहळ्यास हजेरी लावली .आपले विद्यार्थी शासकिय आधिकारी ,व्यवसायिक ,डॉक्टर , इंजिनिअर्स , वकिल ,शेतकरी , कलाकार , व्यापारी , उद्योजक , लोकप्रतिनिधी झाल्याचे पाहून आनंद झाल्याची भावना यावेळी सर्व शिक्षकांनी व्यक्त केली . शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले व आत्मियतेने विद्यार्थ्यांची चौकशी केली .गुरुजन कृतज्ञता सोहळा यशस्वी पार पाड करण्या करिता अनेक मित्रांनी आपआपल्या परीने हातभार लावला. या बॅचमध्ये डॉक्टर, इंजिनीअर्स, वकील, शासकिय आधिकारी , शिक्षक , उद्योजक ,व्यापारी ,व्यवसायिक शेतकरी , लोकप्रतिनिधी अश्या सर्वांचा समावेश आहे. या कृतज्ञता सोहळासाठी राज्यभरातून माजी विद्यार्थी आले होते . २३ जुनला कृतज्ञता सोहळाच्या दिवशी सकाळी कार्यक्रम स्थळी सर्व शिक्षकांचे औक्षण करुन व गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले . मिसळ पाव , कांदा , भजी ,उपीट ,गुलाबजाम चहा , कॉफी दूध ,बिस्किटे असा नाष्टा सर्वांसाठी होता त्याच्या ही आस्वाद सर्वांनी घेतला . त्यानंतर विद्याधाम प्रशालेचा प्रवेशद्वारावर शिक्षकांची धान्यतुला करण्यात आली . तु. म .परदेशी सरांच्या धान्युतुलेने या कार्यक्रमास सुरुवात झाली . आपल्या विद्यार्थ्यांनी आपली धान्यतुला केली व हे धान्य समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असणा-या संस्थाना देवून विद्यार्थ्यांनी केलेल्या सन्मान व आदराने शिक्षक भारावून गेले होते . प्रत्येक शिक्षकास सन्मानाने धान्यतुलेचा तराजू पर्यत विद्यार्थी घेवून गेले .त्याठिकाणी प्रत्येक शिक्षकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली . शिक्षकांच्या धान्यतुलेनंतर टाळ्याच्या कडकडाट होत होता . २२ शिक्षकांची धान्यतुला करण्यात आली व हे धान्य सिंधुताई सपकाळ यांचे मनशांती छात्रालय , माहेर संस्था व अंध अपंग मुलांची शाळा ढाकळी ढोकेश्वर यांना देण्यात आले . यावेळी मनशांती छात्रालयाचे विनायक सपकाळ म्हणाले की गुरुजनांची धान्यतुला करुन संकलित केलेले धान्य समाजातील गरजू घटकांना देण्याचा उपक्रम स्त्युत्य आहे . समाजातील गरजू व वंचित घटकांच्या मदतीसाठी सर्वानी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. दुपारी १२ वाजता शाळेची घंटा वाजली आणि प्रशालेच्या प्रेक्षागृहात गुरुजन कृतज्ञता सन्मान सोहळास सरस्वती पूजन व दिप प्रज्वलनाने सुरुवात झाली . त्यानंतर सर्वांनी शाळेची प्रार्थना व राष्ट्रगीत म्हटले. प्रतिज्ञा ही झाली . उपस्थित सर्व विद्यार्थ्यांची त्यावेळेचे दहावीचे वर्गशिक्षक अनिल तांबोळी यांनी हजेरी घेतली . यानंतर सन १९९३ चा दहावीचा तुकडीत असणारे पण आता या जगात नसणारे ८ विद्यार्थी व एका विद्यार्थिनीस व व दिवगंत माजी शिक्षक यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली . त्यानंतर उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या हस्ते गुरुजनांच्या शाल फरची टोपी , श्रीफल व मिठाई देवुन सन्मान करण्यात आला . प्रशाला गीताचे सामूहिक सादरीकरण यावेळी करण्यात आले या गीतात ' जगात जावू कोठे जरी ही गर्जत ठेवू विद्याधाम ' ही ओळ आल्या नंतर आतिशय अभिमानाने व खड्या आवाजात या ओळी सर्वानी म्हटल्या . त्याच वेळी आपण विद्याधाम प्रशालेचे विद्यार्थी असल्याचा अभिमान व कृतार्थता प्रत्येकाचा चेहरावर झळकत होती . यावेळी "हम होगे कामयाब" व "आता उठवू सारे रान " हे समूहगीते सामूहिकपणे म्हटले.त्याने वातावरणाचा माहौल आधीकच चैतन्यमय व उत्साही झाला . विद्यार्थी व गुरुजन यांचे एकत्रित फोटोसेशन पार पाडले . अनेकांनी आपल्या खास आवडत्या शिक्षकांबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.. त्यानंतर सर्वानी भरपेट भोजनाचा आस्वाद घेतला .भोजनात दुध मॅंगो रबडी , गावरान तुपातील जिलेबी ,मसाले भात , बटर पनीर , भरलेली वांगी , , कोंथबीर वडी , बाजरी , भाकर , चपाती , सुका बटाटा असा बेत होता .त्याच बरोबर मसाला पान ही देण्यात आले . गुरुजन कृतज्ञता सन्मान सोहळा निमित्त विद्यार्थ्यांशी झालेल्या संवाद व मिळालेला सहवास व त्यातून मिळालेली उर्जा आपल्या जीवनात टॉनिक सारखी शक्तीवर्धक ठरेल अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली . दुपारच्या विद्यार्थ्यांच्या सत्रात गप्पा व विद्यार्थी मनोगत झाले .कृतज्ञता सोहळा निमित्त उपस्थित सर्वाना मिठाई बॉक्स देण्यात आला त्यानंतर सर्वानी चहा कॉफी बिस्किटे व सॅडविच चा आस्वाद घेतला . त्यानंतर विद्यार्थी आपण ज्या वर्गखोल्या बसत होतो. त्या वर्ग खोल्यात जावून बॅचेस वर काही मिनिटे मुले मुली बसली विद्यार्थी विद्यार्थिनी ज्या वर्गात आपण शिकलो त्या वर्गात कोणत्या बेंच वर बसायचो ते ही एकमेकांना आवर्जून सांगत होते. अनेकांनी शाळेत प्रवेश करताना शाळेच्या पायरीवर नतमस्तक होत नमस्कार केला. नतमस्तक होत असताना अनेकांचे डोळे पाणवत होते. शाळेचा व्हरडा व प्रयोगशाळा व ग्रंथालयात ही विद्यार्थ्यानी फेरफटका मारला ज्या शाळेने आपणांस घडविले त्या शाळेविषयी अपार आदर व प्रेमाची भावना व्यक्त करित सर्व विद्यार्थी प्रशालेतून आप आपल्या घराकडे मार्गस्थ झाले. गुरुजन कृतज्ञता सन्मान सोहळास मीनल नहार अनिता भोगावडे , विकास पोखरणा ,संजय तंटक , रमेश चिकणे, हरीष धाडीवाल , मध्यकांत पानसरे , अनिल लोंढे , सविता नरवडे ॲड. विरेंद्र सावंत, तुषार पंढरीनाथ दळवी , प्रकाश खेडकर, महावीर बोरा नवनाथ वाखारे , सुनंदा वळसे सतीश गोऱ्हे , शोभा रोडे , गोरख निघुल, सूर्यकांत भुजबळ, डॉ. धीरज सुराणा सुनीता दिवटे, मनिषा लांडे , डॅा वि. ना. धावडे, चंद्रकांत कनिंगध्वज ,प्रीतम दरडा , डॉ .जयश्री झावरे ,सविता पाचंगे , डॉ . दिपाली मुळे , डॉ . रीना बोरा डॉ . राजश्री सोनवणे ( शेलार ) अशोक गंवाडे , रमेश जामदार ,अजित मोरे , संदीप अभंग, शशिकांत फंड , स्मिता बारवकर , विनोद बोथरा ,रुपेश संघवी , तृप्ती दुधेडिया (संचेती), शंकर गायकवाड ., रुपेश संघवी , सुभाष गो-हे , डॉ .भारती रणपिसे, वर्षा पोटावळे , विनय संघवी , गणेश खोले, सुरेखा चिकणे , नामदेव महाराज , डॉ . जीवन खोसे , नीलेश लंटाबळे , डॉ .अमित कर्नावट , मुकेश संघवी , अनिल सोनवणे , सचिन शेळके अमोल महाजन , चेतन निंबाळकर, स्वाती थोरात , विद्या वाघमारे , साबळे नवनाथ , रोहित गादिया, जावेद सय्यद , महेश सणसे , परेश बोरा ,अतुल चव्हाण , सचिन चोपडा , मतीन सय्यद , संतोष नवले ,अतुल बोथरा , राजेंद्र लोखंडे ,प्रशांत थोरात , सतीश धुमाळ आदी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते . राणी कोठारी , सचिन कोठारी , चैताली बोरा , राखी चोपडा , अस्मिता जाधव , गीता राठौड ,हनुमंत वाबळे , पियूष दुगड , अमित साबळे , प्रवीण गायकवाड , जयेश साखला , अर्चना यादव , सविता नरवडे ,विवेक कांबळे , सोन्याबापू नवले यांना प्रत्यक्ष कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही परंतु धान्य तुलेकरीता त्यांनी आपले आर्थिक योगदान पाठवुन दिले . तुम्हीच दिला जीवनास आकार , अक्षरांची दिली करुन ओळख उलगडून दिला त्याचा अर्थ अन भावना , आम्ही पुन्हा पुन्हा चूकावे तुम्ही पुन्हा पुन्हा समजवावे , परि न थकता न रागविता तुम्ही आम्हाला घडवावे . केली शिक्षा आम्हास तरी ही जखमा तुमच्या मनाला . जग रहाटीत असावे , आम्ही पुढे हाच ध्यास तुम्हाला . अनुभवाचा आणि ज्ञानाचा खजिना मुक्तहस्ते आम्हांवरी तुम्ही खर्च केला . याचा जोरावरच उभा आयुष्याचा आमच्या डौलारा . गुरु ,मार्गदर्शक अन हितचिंतक अशी विविध रुपे तुमची आम्हास दाविती जगण्याची वाट . जीवनात असे आमच्या तुमचे खास स्थान . कृतज्ञतेने , कृतार्थतेने करु नित्य दिन तुम्हास वंदन . असावा आशिर्वाद तुमच्या आमच्या सदैव पाठी हीच प्रार्थना गुरुवर्य आपल्या चरणी .