शिरुर दिनांक ( वार्ताहर )निरोगी शरीर हीच खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द शल्यचिकित्सक डॉ. सदानंद गायकवाड यांनी केले . शिरूर येथील डेक्कन स्कूल मध्ये आयोजित केलेल्या आतंरराष्ट्रीय योग दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नियमित व्यायामाचे महत्त्व विषद केले. आपण स्वतः अत्यंत व्यग्र दिनचर्या असूनही नित्य योगोपासना करीत असल्याचे त्यांनी सांगितलेविद्यार्थी व पालकांनी अभ्यासा इतकेच खेळाकडे व नियमित व्यायामाकडे लक्ष्य द्यावे. निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे असे गायकवाड म्हणाले . या वेळी शाळेचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार, योग शिक्षक सुधाकर पोटे, शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य विजयकुमार कुलकर्णी, गणेश मराठे, जनता बँकेचे अधिकारी भाऊसाहेब बेंद्रे, आदिनाथ घनवट, सुभाष गोरे,ॲड . शुभम भाटी आदी उपस्थित होते. यावेळी क्रीडा शिक्षक श्री. चंद्रकांत झांजे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. संगीत शिक्षिका संगीता कुलवंत , मोनाली जाधव यांनी योग गीत सादर केले. जयश्री शिंदे यांनी सूत्र संचालन केले. . चंद्रकांत झांजे यांनी आभार मानले.