जालना जिल्ह्यातील तालुका मंठा येथील पूर्णा नदी पात्रातून परवानगी च्या नावाखाली वाळूचा चोर बाजार होत असल्यामुळे मंठा तहसीलदार यांनी संबंधित एजन्सीला ब्लॅकलिस्ट करण्या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आव्हाल पत्र दिलेले आहे, मंठा तहसीलदार यांनी पूर्णा नदी पात्राच्या परिसरात अनेक ठिकाणी हजारो ब्रश वाळू साठवून ठेवलेली आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मा मुख्यमंत्री म विभागीय आयुक्त संभाजीनगर मा जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे निवेदन देऊन सतत पाठपुरावा केल्यानंतर वाळू घोटाळ्याची चौकशी करून वाळू साठे जप्त होऊ लागले म्हणून पुर्णा नदी परिसरातील काढच्या एका बड्या वाळू माफिया चोरांनी रविवारी दिनांक १६ जुन २०२४ रोजी मराठवाडा व विदर्भातील हद्दीच्या जवळ बिर्याणी पार्टी दिली, या पार्टीत मराठवाडा व विदर्भातील राजकीय नेते, महसुल व पोलीस प्रशासनातील बडे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते म्हणून या पार्टीत पुर्णा नदीकाठच्या वाळू चोरांची मोठी गर्दी दिसली, कारण मंठा तहसीलदारांनी पुर्णा नदीकाठच्या गावांतील अवैध वाळू साठे जप्तीची कारवाई सुरू केल्यामुळे दबाव आणण्यासाठी बिर्याणी पार्टी झाली, म्हणून बिर्याणी पार्टी देणाऱ्या वाळू माफिया व पार्टी खाणाऱ्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चौकशी झाली पाहिजे कारण, मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून संबंधित एजन्सी वाळू माफिया यांनी अवैधरित्या वाळू उपसा करून विक्री केली. पूर्णा नदी परिसरात वाळू साठे करून ठेवले आहे ते जप्त करण्याची कारवाई चालू झाली, म्हणून रविवारी सायंकाळी वाळू माफियांकडून मोठ्या बिर्याणी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, या बिर्याणी पार्टीच्या माध्यमातून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर दबाव आणण्यासाठी हे पार्टी झाली या पार्टीमध्ये बिर्याणी सोबतच किती कोटीचा आर्थिक व्यवहार झाला याची मा.जिल्हाधिकारी जालना यांनी चौकशी झाली पाहिजे, परंतु वाळू माफिया यांचा कोणताही डाव साध्य होणार नाही वाळू माफिया यांनी कोणतेही तंत्र वापरले तरीसुद्धा वाळू साठे जप्त होणार संबंधित एजन्सीने वाळू माफिया यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयाचे गौण खनिज वाळू घोटाळा करून कमाई केली त्या लोकांना वरिष्ठ अधिकारी राजकीय नेते वाचू शकणार नाहीत, कारण नियोजित कट रचून वाळू महा घोटाळा झाल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आवाज उठवण्यात आला तसेच मंठा तालुक्यात सतर्क पत्रकारिता व निडर नागरिक असल्यामुळे जप्तीची कारवाई दबली जाणार नाही, कारण मनसेच्या व तळणी मंठा सगळ्या वर्तमानपत्राच्या प्रतिनिधी या भागातील सतर्क नागरिकांनी वाळूच्या चोर बाजार भरलेला आहे असा आवाज उठवला म्हणून चोर बाजार बंद होण्याच्या मार्गावर आहे, खरे तर संबंधित एजन्सीला परवानगी दिली होती ती रद्द झाली पाहिजे, कारण सामान्य माणसाला वाळू मिळावी म्हणून राज्य शासनाने निर्णय घेतला होता, वाळू डेपो तयार करून गोरगरीबाला स्वस्त भावात वाळू मिळावी हि शासनाची भावना होती, परंतु संबंधित एजन्सी व वाळू माफिया यांनी नियोजित कट रचून म्हणून या वाळू घोटाळ्याची चौकशी व्हायला वाळू माफिया यांची आयकर विभागा मार्फत चौकशी होणार कारण मनसेच्या वतीने जनहितार्थ आवाज उठवल्या मुळे मंठा तहसीलदाराने वाळूचे साठे जप्त करून कारवाई चालू केल्यामुळे वाळू माफिया यांनी बिर्याणी पार्टीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करून मंठा तहसीलदार यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला याची सखोल चौकशी मा. जिल्हाधिकारी साहेब जालना यांच्या मार्गदर्शनाखाली झाली पाहिजे, कारण हा वैयक्तिक विषय नसून शासनाची दिशाभूल करून अधिकृत परवानगी च्या नावाखाली वाळू माफिया यांना हाताशी धरून कोट्यावधी रुपयांची शासकीय मालमत्ता गौण खनिज अवैधरीत्या वाळु विक्री केल्यामुळे मा.अप्पर जिल्हाधिकारी व मा.उपविभागीय अधिकारी परतुर यांनी बिर्याणी पार्टीला कोण वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कोणत्या राजकीय नेत्यांनी समेट घडून आणायचा प्रयत्न केला तहसीलदार मंठा यांच्यावर दबाव आणण्यासाठी ही पार्टीचे आयोजन केले होते का ? या पार्टीत आर्थिक व्यवहार झाला का याची चौकशी झाली पाहिजे, तसेच संबंधित वाळू घोटाळ्याची पारदर्शक चौकशी करून टेंडर रद्द रद्द करण्याची कारवाई झाली झाली तर असा वाळूचा चोर बाजार बंद होईल म्हणून संबंधित एजन्सीला काळ्या यादीत टाकून वाळू साठे जप्त करण्याची कारवाई कंटिन्यू चालू राहील हि मनसेची अपेक्षा आहे...