शिरुर दिनांक (वार्ताहर ) सुहास घेमुड स्मृति चषक बुध्दीबळ स्पर्धा - २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. १२ वर्ष व १५ वर्ष वयोगट अश्या दोन वयोगटात या स्पर्धा झाल्या . यात १२ वर्ष वयोगटाचा स्पर्धेत यांचा तर १५ वर्ष खालील वयोगटात यांच्या प्रथम क्रमांक आला . शिरुर शहरातील मुद्रांक विक्रेते सुहास घेमूड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हॉटेल आशिर्वाद व गणेश भेळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत ७५ हून आधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला . यात १२ वर्षाखालील वयोगटातील विजेते प्रथम क्रमांक -तन्मय पाटील , द्वितीय - अरहन कणसे , तृतीय - अरव संचेती उत्तेजनार्थ - खुशाल मिडगुले , निखीलेश राजूरकर ,ओम पराधी १५ वर्षा खालील प्रथम - किरण इमाडे , द्वितीय -सुशांत यादव ,तृतीय - मितेश सटाले उत्तेजनार्थ - स्वराज्य जगदाळे , शाहुराज फाटे ,श्रेयस कर्डिले स्पर्धेचे पंच म्हणून रोहित आडकर , देवेंद्र ढोकले यांनी काम केले . स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्योजक अमोल घेमुड यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी सरपंच बाळासाहेब सोनवणे , मुद्रांक विक्रेते आबासाहेब जगताप , बुध्दीबळ प्रशिक्षक राजेश शेजवळ , विजय चोरडिया .आदी उपस्थित होते . अमोल घेमूड म्हणाले की ग्रामीण भागात बुध्दीबळाचा प्रचार व प्रसार व्हावा व खेळाडूना प्रोत्साहन मिळावे याकरिता शिरुर शहरात यापुढे बुध्दीबळ स्पर्धेचे नियमित आयोजन करणार आहे