शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील प्रीतम प्रकाश नगर येथील श्री . स्वामी समर्थ मंदिरातील स्वामी समर्थाच्या मुर्तीस शालेय विद्यार्थ्याचा गणवेष परिधान करण्यात आला होता . आज पासून सुरु झालेल्या शाळांच्या पार्श्वभूमीवर स्वामी समर्थ यांच्या मुर्तीस शालेय गणवेष परिधान करण्यात आला होता . यासंदर्भात माहिती देताना श्री . स्वामी समर्थ सेवा मंडळचे गणेश घाटगे व श्यामसुंदर चिखलीकर यांनी सांगितले की शैक्षणिक वर्ष -२०२४ च्या आज पहिल्या दिवस असून आज पासून शाळा सुरु झाल्या आहेत . या पार्श्वभुमीवर विद्यार्थांच्या नवीन शैक्षणिक वर्षास शुभेच्छा देण्यासाठी  स्वामींच्या मुर्तीस शालेय गणवेष परिधान करण्यात आला . सोबत पाटी पेन्सिल , दप्तर व वॉटरबॅग ही ठेवण्यात आली होती . असे योगेश वाळकीकर व सचिन गुंजाळ यांनी सांगितले . दर गुरुवारी स्वामी समर्थ यांच्या महाआरतीचे आयोजन केले जाते त्यास ही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात असे घाटगे यांनी सांगितले .