जिल्हाधिकारी कार्यालयात आज फाळणी स्मृती दिनावर आधारित प्रदर्शन

                       

बीड, दि. 13 (जि. मा. का.) : केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या 14 ऑगस्ट हा फाळणी दुःखद स्मृती दिन म्हणून पाळण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना आहेत. या अनुषंगाने फाळणी स्मृती दिनावर आधारित प्रदर्शनाचे दि. 14 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यसैनिक यांच्या हस्ते दुपारी 12.30 वाजता या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. तरी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, फाळणीबाधित व्यक्ति, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी आदिंनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. फाळणीची शोकांतिका आणि जनसामान्याचे दुःख प्रकट करण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.