औरंगाबाद:- (दीपक परेराव)आज २५ वर्षानंतर भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संजय गव्हाणे यांच्या उस्मानपुरा येथिल स्पेस कम्प्यूटर येथे राष्ट्रध्वजाचे अनावरण केले व तेथून आमचे 100 पेक्षा जास्त सदस्यांनी टू व्हीलर रॅली काढून भारत माता की , जय वंदे मातरम , च्या घोषणा देत क्रांती चौक, पैठण गेट, गुलमंडी ,सिटी चौक, मछली खडक, कुंभारवाडा, औरंगपुरा ,वीर सावरकर चौक, समर्थ नगर येथे रॅलीचा समारोप केले.यावेळी या रॅलीमध्ये अजय जयस्वाल, अनिल जेजुरकर, संजय गव्हाने,अशोक अमृतकर, रफिक भाई, सिद्दिकी, विनोद जोशी, ललित देवडा, विलास खंडेलवाल, सूर्यकांत खंडेलवाल इत्यादी मान्यवरासह 100 पेक्षा जास्त टू व्हीलर रॅली मध्ये सदस्य सहभागी झाले व अत्यंत आनंददायी वातावरणात आम्हला अभिमान वाटत आहे की या अमृत महोत्सवी वर्षाचे आम्ही साक्षीदार झालो असे असोसिएटचे सदस्य यांचे म्हणणे आहे.