शिरुर दिनांक ( वार्ताहर ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिस-यादा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष करीत आनंद साजरा केला . शहरातील पुणे नगर रस्त्यावरील जुन्या नगरपरिषद मंगल कार्यालयाजवळील हॉटेल आस्वाद समोर कार्यकर्त्यानी 'देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो , अश्या घोषणा देत . मोदी , मोदीच्या जयघोष केला .पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या शपथविधीचे थेट प्रक्षेपण करणारी स्क्रीन यावेळी लावण्यात आली होती . यावेळी जिल्हा बॅकेच्या माजी उपाध्यक्षा व भाजपा नेत्या जयश्रीताई पलांडे , भाजपाचे नेते नोटरी धर्मेंद्र खांडरे ,माजी नगरसेवक प्रकाश धाडीवाल , रेश्मा शेख , विजय नरके , उमेश शेळके , अविनाश जाधव , मितेश गादिया , नवनाथ जाधव , हुसेन शहा , अनघा पाठकजी , तुषार भदाणे , रणजीत गायकवाड , राजश्री शिंदे , नवकार कोठारी , राकेश परदेशी आदी उपस्थित होते .