परळी (प्रतिनिधी) सफाई कामगारांना किमान वेतना सहित सोयी-सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर दिनांक ०५ जुलै २०२२ ते आजतागायत लोकशाही मार्गाने कामकरुन दुपारी ०३ ते ०६ धरणे व हल्ला बोल निदर्शने सनदशीर मार्गाने आंदोलन चालू आहे. त्याची दखल न घेतल्याने मा. विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे संतप्त कामगार प्रतिनिधी यांनी दिनांक १० ऑगस्ट २०२२ सकाळी सकाळी 11 वाजता आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. त्याची तात्काळ दखल विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी घेऊन मा. जिल्हाधिकारी बीड यांना प्रकरणी तात्काळ नियमोचित कार्यवाही करावी. प्रकरणात विलंब होणार नाही, याची नोंद घ्यावी असे लेखी पत्र देऊन सुध्दा अद्याप न्याय मिळाला नसल्याने एकीकडे संपूर्ण देशात अम्रत महोत्सव साजरा होत असताना बीड जिल्ह्यातील कंत्राटी कामगार पारतंत्र्यात आहे की काय अशी शंका वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

    आज बीड जिल्ह्यातील कंत्राटी सफाई कामगारांना सहीत इतर कंत्राटी कामगारांची स्थिती अंत्यंत दयनीय अशी होत चालली आहे. एकतर तुटपुंजे वेतन देतात, तेही तीन - तीन महिने उलटून गेले तरी वेतन देत नाहीत. मागणी केली तर कामावरून कमी करण्याची धमकी दिली जाते. याचे कारण म्हणजे गुत्तेदाराची मनमानी व संबंधित अधिकारी यांचे धोरण होय. शासनाने किमान वेतन कायदा व अद्यावत प्रचलित कामगार कायदे, शासन परिपत्रक निर्गमित केले आहे. परंतु मा. जिल्हाधिकारी बीड यांनी लक्ष न दील्यामुळे सफाई कामगारांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातून असंख्य सफाई कामगारांचे कुटुंब मोडकळीस आले आहेत. त्यांच्याकडे कुणीही गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे कामगारां समोर जगण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याची सोडवणूक, तात्काळ करण्याचे पत्र मा.विभागीय आयुक्त यांनी देऊन सुध्दा जिल्हाधिकारी बीड त्याची दखल घेत नसल्याने संतप्त कामगार दिनांक १५ ऑगस्ट 2022 रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र स्वरूपाची टोकाची भूमिका घेऊन लक्षवेधी आंदोलन करतील,होणार्या सर्व अनिष्ट परिणामास महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन व गैर अर्जदार हेच जबाबदार राहतील असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी कळविले आहे.