आज दि.११ रोजी पैठण तालुक्यातील बिडकिन येथील सोनवणे गल्ली येथे असलेल्या सरकारी विहिरीच्या (बारवाच्या) पुर्व दिशेला असणारे जोत्याच्या ३० फुट बाय ५० फुट अशी १५०० चौरस फूट जागेचा बनावट कबाला पत्रक व शासकीय दस्तावेज बनविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी शेख अहमद शेख उस्मान,वय ४९ वर्षे,रा.सादातनगर,बिडकिन यांनी समक्ष पोलिस ठाणे येथे हजर राहून जबाब दिला कि, बिडकिन येथील सोनवणे गल्ली येथील सरकारी विहिरीच्या (बारवाच्या) पुर्व दिशेला असणारे जोत्याच्या ३० फुट बाय ५० फुट अशी एकूण १५०० चौरस फूट जागेचा बनावट कबाला पत्रक व शासकीय दस्तावेज बनविले होते.बिडकिन ग्रामपंचायत कार्यालय तात्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना हाताखाली धरुन नमुना नंबर ०८ ला सन २०१४ साली नोंद झालेली असुन त्याचा मिळकत क्रमांक १६७३ असा आहे.यासंदर्भात फिर्यादी शेख अहमद यांनी माहिती अधिकार कायदा अंतर्गत या नोंदीची मागणी केली असता सदरिल नोंदीची मुळ संचिकेच्या साक्षांकित प्रत आमच्याकडे उपलब्ध नाही असे लेखी कळविण्यात आले आहे.यावरुन असे स्पष्ट होते कि,कबाला पत्रक व इतर कागदपत्रे हे बनावट सही शिक्के बनवुन बनविण्यात आले आहे.व ते सर्व खोटे आहे. याप्रकरणी शेख महम्मद शेख करिम,वय ५५ वर्षे,रा.सोनवणे गल्ली,बिडकिन, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय पैठण येथील एजंट यांच्यावर साथीदार सह मिळुन बनावट सही शिक्के बनवुन सदरिल बनावट कबाला पत्रक व इतर कागदपत्रे बनविले व तात्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना हाताखाली धरुन ग्रामपंचायत कार्यालयात रॅकॉर्डला स्वतःच्या नावे करुन घेतल्या बाबत मा.पोलिस अधिक्षक यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी बिडकिन येथील गावठाण मधील सार्वजनिक जागेचे खोटे व बनावट दस्तऐवज बनवून सरकारी जागेवर अनधिकृतपणे कब्जा केल्याप्रकरणी व बिडकिन ग्रामपंचायत कार्यालय चे तात्कालीन ग्रामविकास अधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यालय पैठण येथील एजंट यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० नुसार ४२०,४६५,४६८,४७१ यानुसार गुन्हा दाखल केला असून शेख महम्मद शेख करिम यास ताब्यात घेण्यात आले आहे.तसेच तात्कालीन ग्रामविकास अधिकारी सारंगधर लोढे यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले असुन उपविभागीय अधिकारी कार्यालय पैठण येथील एजंट यांची शोधाशोध सुरू असुन लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत आहे.