शिरुर दिनांक ( वार्ताहर )  चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक  प्रा. मच्छिंद्र शिवाजीराव खोडदे वय ६१ यांचे निधन झाले . त्याच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा ,दोन मुली  असा परीवार आहे . खोडदे हे बोरा महाविद्यालयाचा कनिष्ठ महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते .अभ्यासू व विद्यार्थप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती . शिरूर येथील अमरधाम येथे अंत्यविधी झाला . यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . यावेळी माजी नगरसेवक दादाभाउ वाखारे , बोरा महविद्यालयातील भुगोल विभागाचे माजी प्रमुख प्रा . चंद्रकांत धापटे , सरपंच पकंज कारखिले आदीनी श्रध्दांजली वाहिली.