शिरूर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर एस. टी डेपोतून वाहक दत्तात्रय नामदेव शेलार हे 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून तर चालक रावसाहेब बोऱ्हाडे हे 34 वर्षाच्या व वाहक बाजीराव थेऊरकर 36 वर्षाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले .त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक जाहीर सत्कार करण्यात आला. या तीनही एस . टी महामंडळाच्या कर्मचा-यांनी प्रामाणिकपणे व सचोटीने सेवा केल्याचे गौरवोद्गगार मान्यवरांनी याप्रसंगी काढले . येथील महाराष्ट्र राज्य एस.टी महामंडळ शिरूर आगारातील सेवानिवृत्त होत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार समारंभ एस.टी कामगार संघटना, शिरूर आगार यांच्यावतीने करण्यात आला . याप्रसंगी महाराष्ट्र राज्य एस.टी कामगार संघटना, महाराष्ट्र केंद्रीय अध्यक्ष संदिप शिंदे , एस.टी कामगार संघटनेचे सचिव दिलिप परब , महिला संघटक शिलाताई नाईकवडे , एस.टी कामगार संघटनेचे कामगार नेते उल्हासराव घाटगे शिरूर एस. टी आगार व्यवस्थापिका मनिषा इनामके आदी उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय नामदेव शेलार (वाहक - 37 वर्षे प्रदीर्घ सेवा), रावसाहेब बोऱ्हाडे (चालक - 34 वर्षे सेवा), बाजीराव थेऊरकर (वाहक -36 वर्षे सेवा) यांचा सपत्नीक जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखाना चे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे , श्रीगोंदा सहकारी साखर कारखानाचे संचालक विठ्ठल जंगले , माजी कार्यकारी संचालक आबासाहेब सूर्यवंशी , बाळासाहेब रावसाहेब पवार, माजी सरपंच उद्धव शेलार , श्रीरामजी सह.वि.का. सोसायटीचे चेअरमन सचिन पवार , माजी .जि.प.सदस्य अंकुश सोनवणे , माजी पंचायत समिती सदस्य सुनील जंगले , ह.भ.प..अविनाश महाराज साळुंखे , ह.भ.प. भुजंग महाराज शेलार , शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळ माजी सभापती राजेंद्र जाधवराव , माजी नगरसेवक, विठ्ठल पवार , उद्योजक विजय नाझीरकर संतोष शेलार,रामदास शेलार ,माजी प्राचार्य अनिल तांबोळी , मुख्याध्यापिका सौ. सुषमा राजेंद्र शितोळे ए.सी.महाविद्यालय, वरवंड येथील प्रा . डॉ .राणी शेलार , शोभना पाचंगे, राजश्री ढमढेरे, बोरा महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ .बालकृष्ण लळित , शांतीलाल काळे , पोलीस आधिकारी अभिजीत काळे, अनिलराव पडवळ , राजेंद्र रोडे, संजय कडेकर, संभाजी नातू आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिरूर एस.टी कामगार संघटना व शिरूर आगारातील सुनील जगदाळे, रामभाऊ जेऊघाले राजेंद्र काळे, नितीन देशमाने, श् लक्ष्मण जगताप आदीनी केले होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहक वैशाली पाटील यांनी केले तर आभार प्रा.सचिन दत्तात्रय शेलार, यांनी मानले.