बीड (प्रतिनिधी):- देवगिरी प्रतिष्ठान,बीड आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेत राजीव गांधी महाविद्यालय,सोनपेठ, जि.परभणीचा विद्यार्थी प्रशांत सुधाकर शिंगाडे याने प्रथम पुरस्कार पटकाविला आहे. देवगिरी प्रतिष्ठान बीडच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा शुक्रवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता तुलसी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय,बीड येथे आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेचे उद्घाटक म्हणून मुख्य संयोजक प्रा.प्रदीप रोडे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून संयोजन समिती सदस्य प्रा.राम गायकवाड, प्रोफेसर.डॉ.मनोहर सिरसाट ,प्राचार्य डॉ.पांडुरंग सुतार, देवगिरी वृत्तचे संपादक अनिल सावंत, प्राचार्य डी.जी.निकाळजे,प्राचार्य अश्विनी बेद्रे, परिक्षक प्रा.लक्ष्मण गुंजाळ,प्रा.शरद सदाफुले, व्याख्याते राहुल गिरी यांची उपस्थिती होती.
देवगिरी प्रतिष्ठान बीडच्या माध्यमातून गेल्या १३ वर्षा पासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा आयोजित केली जाते.महापुरुषांच्या आदर्शाची परंपरा भावी पिढी समोर यावी हा उद्देश डोळ्या समोर ठेवून राज्यस्तरीय महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. मानवतावादी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली .प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. पांडुरंग सुतार यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची उंची जागतिक पातळीची आहे. अण्णाभाऊ यांच्या कथा,कादंबऱ्यातील नायक अन्याया विरुद्ध लढणारा होता असे मत व्यक्त केले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रा.प्रदीप रोडे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती देऊन वकृत्व स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेतून अनेक दिग्गज व्याख्याते निर्माण झाले असल्याचे प्रा.प्रदिप रोडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागातून स्पर्धक मोठ्या संख्येने वकृत्व स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विषय अण्णाभाऊ साठे यांचे विचार आणि अनुयायांची भूमिका,अण्णाभाऊ साठे यांची साहित्य आणि कार्यातील तत्त्वज्ञान,अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रसंगीकता हे होते. यावेळी ७ मिनिट वेळेत स्पर्धकांनी उत्कृष्टपणे वकृत्व सादर करून स्पर्धा गाजवली. स्पर्धेचे सूत्रसंचालन योगिता लांडगे यांनी केले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा.विवेक जोगदंड, प्रा.डॉ.विकास वाघमारे,प्रा.अंकुश सुर्वे,संजय धुरंधरे,प्रा.पुनम डोळस,प्रा.शिल्पा बोराडे,प्रा.प्राची पाठक कर्मचारी विशाल रोडे,विजय नागरगोजे, सुदर्शना वीर यांनी परिश्रम घेतले.
चौकट:
---------------------------------------------
*राज्यस्तरीय महाविद्यालयीन वकृत्व पुरस्कार प्राप्त स्पर्धक*
प्रथम पुरस्कार: प्रशांत सुधाकर शिंगाडे
(राजीव गांधी महाविद्यालय,सोनपेठ, जि.परभणी) ५०००/- रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र
द्वितीय पुरस्कार: पुनम किशोर धुताडमल
(सौ.के.स.के. महाविद्यालय,बीड)
३०००/- रुपये स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र.
तृतीय पुरस्कार: साईनाथ नामदेव महादवाड
(यशवंत महाविद्यालय,नांदेड)
२०००/- रुपये स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र.
*उत्तेजनार्थ पुरस्कार*
प्रथम पुरस्कार:संकेत कृष्णा पाटील
(कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,कोल्हापूर)
१०००/- रुपये स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र
द्वितीय पुरस्कार: रोहन नामदेव चव्हाण
(बलभीम कॉलेज,बीड)
१०००/- रुपये स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार: साधना परमेश्वर आगलावे
(तुलसी कॉलेज,बीड)१०००/- रुपये स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र
हा पुरस्कार स्पर्धकांनी पटकाविला आहे. मान्यवरांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत