शिरुर दिनांक ( वार्ताहर )शिरुर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरु झाले आहे .प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ९ पर्यत ४.३२% मतदान % मतदान झाले .तर ११ वाजेपर्यत १२.२५% मतदान झाले . शिरुर शहरातील विद्याधाम प्रशाला , मुंबई बाजार येथील शिरुर नगरपरिषदेच्या शाळामधील मतदान केंद्र व बोरा महाविद्यालयातील मतदानकेंद्रावर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती . शिरुर विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकी करीता ४३९ मतदानकेंद्रे असून मतदान केंद्राध्यक्षासह एकूण २१७८ मतदान अधिकारी व कर्मचारी निवडणुक कर्तव्यावर कार्यरत आहे . याखेरीज ४३९ पोलीस कर्मचारी नियुक्त करणेत आले असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व तहसिलदार व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय आधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले . . शिरुर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत शिरुर विधानसभा मतदारसंघामध्ये दि. १३ मे २०२४ रोजी मतदान होत असून सदर मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने राज्य वखार महामंडळ गोदाम, कारेगाव ता . शिरूर, या ठिकाणावरुन शिरुर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी दि. १२ मे २०२४ रोजी एकूण ४३९ मतदान केंद्राकरीता मतदान पथके रवाना करण्यात आल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व अतिरीक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी दिली . आमदार ॲड . अशोक पवार यांनी वडगाव रासाई येथे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी टाकळी हाजी तर माजी आमदार काकासाहेब पलांडे यांनी मुखई येथील मतदान केंद्रावर मतदान केले .