शिरुर दिनांक ( वार्ताहर्) शिरुर विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकी करीता ४३९ मतदानकेंद्रे असून मतदान केंद्राध्यक्षासह एकूण २१७८ मतदान अधिकारी व कर्मचारी निवडणुक कर्तव्यावर कार्यरत आहे . याखेरीज ४३९ पोलीस कर्मचारी नियुक्त करणेत आले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व तहसिलदार व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय आधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे .

   शिरुर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत शिरुर विधानसभा मतदारसंघामध्ये दि. १३ मे २०२४ रोजी मतदान होत आहे . सदर मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने राज्य वखार महामंडळ गोदाम, कारेगाव ता . शिरूर, या ठिकाणावरुन शिरुर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी दि. १२ मे २०२४ रोजी एकूण ४३९ मतदान केंद्राकरीता मतदान पथके रवाना झाली आहेत. पथकामधील कर्मचाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण पार पडले असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व अतिरीक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक कामकाजाबाबत मार्गदर्शन करुन आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. सदर मतदान पथकामध्ये मतदान केंद्राध्यक्षासह एकूण २१७८ मतदान अधिकारी व कर्मचारी निवडणुक कर्तव्यावर कार्यरत असून ४३९ पोलीस कर्मचारी नियुक्त करणेत आलेले आहेत.