अपक्ष उमेदवार डॉ. जीवन राजपूत गंगापूर तालुक्यातील विविध गावांतील मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर
लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉ. जीवन राजपूत यांनी प्रचारात आघाडी घेतली असून शनिवारी छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील करोडी व गंगापूर तालुक्यातील आसेगाव, घाणेगाव, नांदेडा, एकलेहरा गावांना भेटी देऊन तालुका पिंजून काढला आहे.
उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांनी गंगापूर
तालुक्यातील आदी गावांना भेटी देऊन मतदारांच्या
गाठीभेटी घेतल्या तसेच निवडणुक प्रचार कॉर्नर बैठकांना
मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. घाणेगाव
येथील कॉर्नर बैठकीची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली तसेच देवनाथ पल्हाळ त्यांच्या घरासमोर वृक्षारोपण करून प्रचार सुरू करण्यात आला. गावक? यांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या, अडीअडचणी, प्रशन समजून घेऊन संवाद साधून त्या सोडवण्यासाठी प्रयतन केले जातील असे आश्वासन डॉक्टर जीवन राजपूत यांनी दिले. त्यांच्या या कॉर्नर बैठकांना आणि गाठीभेटीना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत डॉक्टर जीवन राजपूत यांना निवडून देण्याचा निवडून आणण्याचा निर्धार केला.
 
  
  
  
   
   
  