शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारासाठी भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्षा सुलताना शेख यांनी शिरुर शहरातून पदयात्रा काढत मतदारांशी संपर्क साधला . शहरातील लाटेआळी , हल्दी मोहल्ला , भाजीबाजार या भागातून ही पदयात्रा गेली . पदयात्रेत भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्या राज्य पदाधिकारी रेश्मा शेख , पुणे जिल्हाध्यक्ष राजू शेख , हुसेन शहा यांचा सह राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार , शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात , सुरेश गाडेकर , भाजपाचे माजी शहरप्रमुख केशव लोखंडे , अविनाश जाधव , प्रवीण मुथ्था , विजय नरके , माजी नगरसेविका अंजली थोरात , भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रिया बिरादार , राजश्री शिंदे ,राष्ट्रवादी कॉग्रेसचे ऐजाज बागवान , शृतिका झांबरे , रंजन झांबरे , यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते . यावेळी बोलताना सुलताना शेख म्हणाल्या की मोदी सरकारने महिलांसाठी मोठे काम केले आहे . यंदाच्या लोकसभा निवडणूकीत भाजपा चारशे हून आधिक जागा मिळवेल असा विश्वास भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सुलताना शेख यांनी व्यक्त केला . अल्पसंख्याकांच्या विकासाचा विविध योजना मोदी सरकारने राबविल्या असून शिरुर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले .