रोशनगाव येथील शेतकरी वर्गाच्या वतीने गावातील सर्व शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून गावालगतच गोदावरी काठी वसलेले गाव असून 70-75%शेती ही गोदावरी काठी शेती आहे.त्यामुळे दि.9.7.2022 ते 14.7.2022 रोजी दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील जवळपास 80 ते 90 टक्के शेतीतील, दोन वेळा पेरणी करून सुद्धा सोयाबीन,कापूस, सर्व पिकांचे नुकसान झाले आहे याबाबत तलाठी व कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांनी पंचनामा केले आहेत तसेच सर्व झाल्यानंतर 26 जुलै रोजी झालेली अतिवृष्टी पिके सर्व पाण्याखाली गेली असून.*धर्माबाद तहसीलदार साहेब व कृषी सहाय्यक अधिकारी यांना रोशन गावातील नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.* गावातील वाशींकडून सर सकट 70-80% प्रमाणे शासनाने मदत अशा व्यक्त केली जात आहे..  

तालुका धर्माबाद- सिध्देश्वर मठपती