शिरुर दिनांक ( वार्ताहर ) आव्हाने असतील तरच प्रगती होते असे प्रतिपादन माजी कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविणे बाबत विज्ञान शाखेतील विषयांसाठी कार्यशाळेचे आयोजन शिरुर येथे करण्यात आले होते . यावेळी बोरा महाविद्यालयच्या नियामक मंडळाचे सदस्य धरमचंद फुलपगर, डॉ संजय ढोले , विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य. डॉ .प्रमोद पाटील , प्राचार्य डॉ के सी मोहिते हे उपस्थित होते. या कार्यशाळेत उद्घघाटनपर मनोगत व्यक्त करताना डॉ पंडित विद्यासागर म्हणाले की आव्हाने असतील तरच आपण अधिक एकाग्र चित्ताने काम करतो आणि त्यामुळेच आपली प्रगती होत असते . विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वीपणे राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ संजय ढोले , व प्राचार्य. डॉ प्रमोद पाटील पाटील व प्राचार्य डॉ के सी मोहिते यांनी मार्गदर्शन केले. डॉ डॉ. एन.एम. घनगावकर प्रस्ताविक केले .प्राचार्य के सी मोहिते यांनी उपस्थितांचे स्वागत केले व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. बोरा महाविद्यालयास नॅकचे ए प्लस मूल्यांकन मिळाल्याचे सांगितले . डॉ संजय ढोले यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 च्या सुधारित आराखड्यानुसार सादरीकरण केले. प्राचार्य. डॉ प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी सुधारीत आराखड्यातील विविध पैलू बाबत उपस्थितांना अवगत केले. धरमचंद फुलपगर यांचे ही मनोगत झाले . कार्यशाळेत प्राणिशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. चौधरी, वनस्पती शास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ खर्डे, रसायन शास्त्र , भौतिक शास्त्र व वनस्पती शास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. रामा पवार डॉ. रमेश भिसे, डॉ .अनिल गर्जे , डॉ .विनायक लोखंडे इ तज्ञ प्राध्यापकांनी उपस्थितांची मते जाणून घेऊन मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचे आयोजन एआरसी समन्वयक डॉ. एन.एम. घनगावकर, आयक्यूएसी चे समन्वयक डॉ. सुनिल भोईटे तसेच, प्रा.एच. एस जाधव, डॉ .पी. एस .वीरकर, डॉ. डी एच बोबडे व आदीनी केले.