जिंतूर,दि.10(प्रतिनिधी-जिंतूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात 45 वर्षीय प्राध्यापकाचा मृतदेह आढळल्याने तंत्रनिकेतन मध्ये मोठे खळबळ उडाली असून तो आत्महत्येचा की घातपात आहे, याविषयी तर्क विर्तकांना अक्षरक्षः उधाण आले आहे.

जिंतूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या उपहारगृहाच्या पाठीमागे जगदीश गव्हाणे(रा.लातूर) यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेतला. पाठोपाठ या घटनेबाबत लगेचच उलट-सुलट चर्चा सुरू झाली. परंतू तंत्रनिकेतनच्या अधिकारी-कर्मचा-यांनी या संदर्भात वेगवेगळ्या शंका-कुशंका व्यक्त केल्या. या परिसरातच या प्राध्यापकाचे बुट सापडले. बाजुला बाटल्या ही आढळून आल्या. तसेच मृत प्राध्यापकाचा मोबाईल ही गायब असल्याची माहिती निदर्शनास आली. तातडीने पोलिस निरीक्षक दीपक दंतुलवार यांच्यासह कर्मचा-यांनी धाव घेवून या प्रकरणात तपास सुरू केला. परंतू सायंकाळपर्यंत याबाबत कोणत्याही प्रकाराचा खुलासा हाती लागू शकला नाही.