औरंगाबाद :- (दीपक परेराव) दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी,आम आदमी पार्टीची मराठवाडा विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसाठी एक दिवशीय बूथ पातळीवरील स्वयंसेवक प्रशिक्षण पार पडले.
प्रशिक्षणाची नियोजनाची जबाबदारी जिल्हा अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्यावर होती त्यांनी व सहकाऱ्यांनी ही महत्वपूर्ण जबाबदारी अतिशय चोख पार पाडली
सदर प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रभारी आदरणीय महादेव नाईक ह्यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेश अध्यक्ष रंगा राचुरे ह्याच्या प्रमुख उपस्थितीत होती सदर प्रशिक्षणासाठी युवा आघाडीचे प्रदेश संयोजक अजिंक्य शिंदे आणि नव्याने राज्य समितीवर नियुक्ती झालेले जिल्हाध्यक्ष ऍड अजित खोत यांची देखील विशेष उपस्थिती होती. या शिबिरासाठी मराठवाड्यातून अंदाजे दोनशे ते तीनशे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रभारी, माजी मंत्री गोवा राज्य महादेव नाईक व रंगा राचुरे यांनी औरंगाबाद येथील महानगरपालिका निवडणुक जिल्हा अध्यक्ष तथा शहर कार्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वात होतील असे स्पष्ट केले, तसेच युवा प्रदेश अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी निवडणुक नियोजन साठी बूथ बांधणी कशी करावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मराठवाड्यातून मराठावाडा विभागीय पदाधिकारी तसेच प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष सह त्यांचे सहकारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण हिवाळे जनसंपर्कप्रमुख प्रचार समिती यांनी केले.यानंतर प्रश्न उत्तराच्या सत्रामध्ये सर्वांनी विविध प्रश्न विचारून आपले शंकाचे निरासन करून घेतले. व त्यानंतर मध्यान भोजनाच्या कार्यक्रमानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.