स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत जिंतूर शहरासह तालुक्यात आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन संपन्न होत असून कार्यक्रमास अभुतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. आज आमदार मेघना बोर्डीकर भाजप तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत माजी नगराध्यक्ष सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनात व भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष किशोर जाधव यांच्या पुढाकाराने शहरातून भव्य अशी तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली. शहराच्या मुख्य मार्गावरून या रॅलीने शिस्तबद्ध पद्धतीने आपले संचलन केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून शहर भर मार्गस्थ होत अण्णा भाऊ साठे चौकात समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आझादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा ही मोहीम कन्याकुमारी ते काश्मीर पर्यत राबवली जात असून संपूर्ण देशात या मोहिमेस अभूतपूर्ण असा प्रतिसास भेटत आहे.या मोहिमेस देशवाशिया तर्फे प्रचंड प्रतिसाद भेटताना दिसून येत आल्याची माहिती आमदार मेघना बोर्डीकरांनी या वेळी दिली.त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष मोटारसायकल वर बसून हातात तिरंगा घेऊन या रॅलीत सहभाग नोंदविला. या रॅलीत डॉ.पंडित दराडे,सुरेश भुमरे, मनोहर सातपुते,संदीप घुगे,सुनील घुगे,अमोल देशमुख,अशोक बुधवंत, अल्पसंख्याक अध्यक्ष एम एजाज, सचिन रायपत्रीवार, रवी घुगे,गणेश कदम, मतीन तांबोळी, बाळू पिंपळकर,गणेश दराडे,युवराज घनसावध रमेश मोहिते,या असंख्य भाजप कार्यकृत्ये व पदाधिकारी यांचा समावेश होता.एकूणच या मोटरसायक तिरंगा रॅलीने शहरवाशियाचे लक्ष वेधून घेतले होते. या मोटारसायकल तिरंगा रॅलीच्या बंदोबस्ता साठी पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.या वेळी त्यांच्या समवेत गोपनीय शाखेचे वल्लभ धोत्रे, बपीएसआय हांडे, एएसआय खंदारे, पोलीस कर्मचारी शिंदे आदींचा समावेश होता