शिरुर दिनांक (वार्ताहर ) शिरुर विधानसभा मतदारसंघातून आपणांस विक्रमी मतदान होईल असा विश्वास व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसरादा पंतप्रधान होणार असून शिरुर लोकसभा मतदार संघातही मोदींच्या विचाराचा खासदार पाहीजे असे शिरुर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव म्हणाले . महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शिरुर शहरातून रॅली काढून मतदारांशी संपर्क साधला . बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ . आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन या रॅलीस सुरुवात झाली . या रॅलीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद , भाजपाच्या नेत्या व जिल्हा बॅकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे , नोटरी धर्मेंद्र खांडरे , भाजपाचे नेते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे , भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे ,राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे , दादापाटील फराटे , संतोष शितोळे , मनसेचे जिल्हा उपप्रमुख महिबूब सय्यद , राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी कु-हाडे , भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार , शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात , आरपीआय शहराध्यक्ष नीलेश जाधव ,माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , ,मनसेचे शहराध्यक्ष ॲड . आदित्य मैड , तालुका संघटक अविनाश घोगरे , यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते . ही रॅली पुणे नगर रस्ता, मारुती आळी, सरदार पेठ , हलवाई चौक , सुभाष चौक , कुंभार आळी ,आडतबाजार मार्गे कापड बाजारात गेली . आढळराव यावेळी म्हणाले की शिरुर शहराच्या दृष्टीने महत्वाचा असणारा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे . विद्यमान खासदारांनी विकासाची कोणती कामे केली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला . मतदारसंघातील विविध विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले .