शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर शहरास पाणी पुरवठा होत असलेल्या घोडनदीवरील कोल्हापुर पध्दतीचा बंधाऱ्यातील पाणीसाठा अत्यंत कमी प्रमाणात शिल्लक राहिलेला आहे. कुकडी पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडणेची मागणी केलेली असुन पाठपुरावा सुरु आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे यांनी केले आहे . काळे म्हणाल्या की बंधाऱ्यात उपलब्ध असणारा पाणीसाठा काटकसर करुन वापरणे आवश्यक आहे. शहरातील नागरिकांनी  पाण्याचा वापर जपुन व काटकसरीने करावा. तसेच ज्या नळ कनेक्शन धारकांनी नळाला तोट्या लावलेल्या नाहीत त्यांनी नळाला तोट्या बसवुन घ्याव्यात, नळ कनेक्शनला वीज मोटार लावुन जास्तीचा पाणीसाठा करु नये, पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊ नये म्हणुन टाक्यामध्ये बॉल वॉल बसवावा तसेच पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अंगणात पाणी टाकणे, पाईप नाली मध्ये पाणी सोडणे, गाडी धुणे असे केल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल असा इशारा ही त्यांनी दिला आहे .