शिरुर दिनांक ( वार्ताहर ) डॉ . बाबासाहेब आंबेडकर विचारमंच शिरुर यांच्या वतीने भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त २० ते २१ एप्रिल २०२४ दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रवीण गायकवाड यांनी दिली .

   शनिवार दि , २० एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता लेखक कवि व ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांचे ' डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाही ' या विषयावर तर रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी ज्येष्ठय पत्रकार व लेखक आनंद शितोळे यांचे ' संविधानाने दिलेली मूलभूत हक्क व कर्तव्ये' याविषयावर व्याख्यान होणार असून हॉटेल राजभोग बॅक्केट हॉल शिरुर येथे होणार आहेत .