शिरुर दिनांक ( वर्ताहर ) स्वच्छ सर्वेक्षण - 2024 व माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत शिरूर नगरपरिषद व सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात जागतिक वारसा दिन साजरा करण्यात आला . यावेळी शहरातील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, आंबेडकर उद्यान येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व जुनी नगरपालिका मंगल कार्यालय येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यांची व आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करणेत आली. या स्वच्छता मोहिमेत सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तसेच यादरम्यान माझी वासुंधरा अभियानाची हरित शपथ घेण्यात आली. सदर मोहिमे दरम्यान स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता आदित्य   बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय  बर्गे, शहर समन्वयक प्राची  वाखारे, सिताबाई थिटे महाविद्यालयाचे प्रा. मानसी  सोनवणे व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी, शिरूर नगरपरिषदेचे स्वच्छता मुकादम व सफाई कर्मचारी उपस्थित होते.. शिरूर नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'जागतिक वारसा दिन साजरा करण्यात आला .