रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषक प्रणिता पवार तर तृतीय पारितोषक मनिषा गाडे यांनी मिळवले

पाटोदा (प्रतिनिधी) स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पाटोदा उमेद अभियाना यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आवाहन केल्यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षे निमित्त देशभरात मोठ्या उत्साहात"हर घर तिरंगा अभियानांतर्गत मोठ मोठाले कार्यक्रम साजरा होत असून पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आज उमेद कार्यालय पाटोदा यांच्या वतीने बचत गटातील महिलांचा भव्य रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस सिद्धिविनायक महिला बचत गट कुसंळबच्या प्रणिता योगेश पवार व द्वितीय वामन भाऊ बचत गट पिंपळवंडीच्या साधना आतुल पवार व रुपाली अरुण तांबे भाग्यलक्ष्मी बचत गट उंबरहिरा यांनी मिळवले तर तृतीय पारितोषक कविता गणेश पेचे व मनिषा अनिल गाडे छत्रपती जिजाऊ बचत गट मुगगाव यांनी मिळवले रांगोळी स्पर्धेचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पाटोदा उमेदचे कर्मचारी तालुका व्यवस्थापक कैलास वीर,अश्विनी खेडकर, प्रभाग समन्वय संतोष भोसले, शकुंतला जावळे, वैशाली देवकाते, अविनाश साबळे,स्वाती मिसाळ यांनी कष्ट घेतले रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण पाटोदा तहसीलच्या तहसीलदार चौगुले मॅडम व उमेशचे व्यवस्थापक कैलास वीर व तालुका व्यवस्थापक अश्विनी खेडकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी पाटोदा तालुक्यातील बचत गटातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषक प्रणिता पवार,दुतीय साधना पवार,रुपाली तांबे,तृतीय पारितोषक मिळवलेल्या कविता पेचे व मनिषा गाडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सर्व स्पर्धकांचे कौतुक पाटोदा तहसीलच्या तहसीलदार यांनी केले असून पुढील स्पर्धेत इतर बचत गटातील महिलांनाही बक्षीस मिळावा म्हणून शुभेच्छा दिल्या