शिरुर दिनांक ( वार्ताहर ) श्रीरामनवमी निमित्त समस्त नामदेव शिंपी समाज श्रीराममंदिरात ओंकार संगीत विद्यालय व डेक्कन एज्युकेशन स्कूल शिरुर यांच्या वतीने संगीत गीत रामायणाचा कार्यक्रम सादर करण्यात आला त्यास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते . ' राम जन्मला ग सखे राम जन्मला , दशरथा घे पायसदान , स्वयंवर झाले सीतेचे, मोडू नका वचनास , जय जय गंगे , पराधीन आहे जगी पुत्र मानवाचा , सेतू बांधा रे सागरी , लव कुश रामायणे गाती यासह रामायणातील विविध प्रसंगावर आधारित गीते यावेळी सादर करण्यात आली . ओंकार संगीत विद्यालयाचे प्रमुख गायक वैभव मराठे , डॉ . समीर ओंकार , डॉ . नूतन क्षीरसागर , संगीता कुलवंत,गोपाल भावसार , योग ताम्हाणे , मोनाली जाधव ,सुषमा झावरे , शरण्या क्षीरसागर ,शांभवी क्षीरसागर , गोजिरी भावसार , गीत जाधव , श्रावणी बनकर , शुभांगी थिटे , अन्वय मापेडवार , अर्णव भोंग  आदींसह विद्यालयातील विद्यार्थी ,विद्यार्थिनी यांनी गीते सादर केली . यावेळी कार्यक्रमाचे निवेदन माजी मुख्याध्यापाक व्ही .डी कुलकर्णी यांनी केले तर तबल्यावर साथ शुभम मोडक यांनी दिली . यावेळी , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , सिध्देश्वर बगाडे , विवेक बगाडे, गायक हरि मेंहदरकर , डॉ . आनंद क्षीरसागर , माजी मुख्याध्यापक अनिल तांबोळी , डॉ . मुळे , प्रवीण मुथ्था , व्यवसायिक केतन गोसावी ,प्रशांत अवचट , रोहिणी आवटी आदी उपस्थित होते .कार्यक्रमाच्या शेवटी जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला .