शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर तालुक्यात ४ गावात पिण्याचा पाण्याचे ११ टॅकर सुरु करण्यात आले असल्याची माहिती गटविकासधिकारी महेश डोके व ग्रामीण पाणीपुरवठाचे वरिष्ठ लिपीक यशवंत वाटमारे यांनी दिली . पाबळ येथे ६ टॅकरच्या २४ खेपा तर केंदूर येथे ४ टॅकरच्या १२ खेपा , धामारी येथे १ व कान्हूर मेसाई येथे १ टॅकर सुरु करण्यात आला असून सध्या ११ टॅकर द्ववारे टॅकरच्या ४० खेपा सुरु असल्याचे डोके व वाटमारे यांनी सांगितले .