शिरुर दिनांक ( वार्ताहर ) भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिरुर येथे विविध संस्था संघटना यांच्या वतीने  डॉ .आंबेडकर यांच्या पुरळ्यास पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन करण्यात आले . शहरातील डॉ .आंबेडकर उद्यानातील भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती . शिरुरच्या नायब तहसिलदार स्नेहा गिरगोसावी , पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे ,शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी स्मिता काळे , पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे , राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सयुंक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भालेराव ,उपाध्यक्ष कैलास गायकवाड व मंगल गायकवाड मिरवणूक प्रमुख नीलेश जाधव ,सचिव -प्रमोद गायकवाड , कार्याध्यक्ष अविनाश शिंदे , सहकार्याध्यक्ष ॲड . कुणाल गायकवाड ,कोषाध्यक्ष सुनील थोरात , सहकोषाध्यक्ष बबन गायकवाड ,सहसचिव किरण दिवटे , रमेश शिंदे , आदित्य उबाळे, मयूर भोसले , रमेश कांबळे , हर्षद कांबळे , हर्ष गायकवाड , बाळासाहेब राजगुरु , विशाल ससाणे ,प्रकाश डंबाळे , सचिन जाधव ,जयेश थोरात ,अमर झेंडे , नितीन काळे ,अकिल शेख , भाजपचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे ,प्रा.रतनकुमार ससाणे , मुख्याध्यापक संजय वाघ , माजी नगरसेविका ॲड .माया गायकवाड , शरद गायकवाड , माजी नगरसेवक आबिद शेख ,जगन्नाथ भोसले , रामभाउ झेंडे , डॉ . प्रवीण गायकवाड , आदी यावेळी उपस्थित होते . जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद ,जिल्हा बॅकेच्या माजी उपाध्यक्षा भाजपा नेत्या जयश्री पलांडे , भाजपाचे नेते नोटरी धर्मेंद्र खांडरे ,  राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे , शहराध्यक्ष शरद कालेवार ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाउ सासवडे , भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे आदीनी डॉ . आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करुन अभिवादन केले . यावेळी बोलताना प्रदीप कंद म्हणाले की माणूस म्हणून जगण्याचा आधिकार भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला . जयश्री पलांडे व धर्मेंद्र खांडरे यांनीही मनोगत व्यक्त केले . राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सयुंक्त जयंती उत्सव समिती यांच्या वतीने दिनांक ११ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान भीम फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते .गुरुवार ११ एप्रिल रोजी वक्क्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यादिवशी सायंकाळी भारतरत्न डॉ . बाबसाहेब आंबेडकर उद्यानात महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले . ॲड . उज्जवल निकम व अनुरिता झगडे यांची व्याख्याने झाली . त्याच बरोबर गायक संतोष गोंधळे व गायिका कडूबाई खरात यांचा गायनाचा कार्यक्रम झाला . प्रसिध्द उद्योगपती व नगरपालिकेचे माजी सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांना भीमरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आल्याचे विनोद भालेराव यांनी सांगितले . रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ . आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले व त्यानंतर अभिवादन सभा झाली .त्यास मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते .