शिरुर दि . ( वार्ताहर ) :   राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सयुंक्त जयंती उत्सव समिती यांच्या वतीने दिनांक ११ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान भीम फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक विनोद भालेराव यांनी दिली . गुरुवार ११ एप्रिल रोजी वक्क्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्याच बरोबर सायंकाळी सात वाजता भारतरत्न डॉ . बाबसाहेब आंबेडकर उद्यानात महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येणार आहे . शुक्रवार दिनांक १२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता 'देशाची शान स्त्रीचा सन्मान ' या विषयांवर अनुरिता झगडे यांचे व्याख्यान होणार आहे . शनिवार दिनांक १३ एप्रिल रोजी गायक संतोष गोंधळे व गायिका कडूबाई खरात यांचा गायनाचा कार्यक्रम होणार असून भीमरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे . रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता भारतरत्न डॉ . बाबसाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ . आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे .११ वाजता अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे . सायंकाळी डॉ .आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे भालेराव यांनी सांगितले . भीम फेस्टिवलचा कार्यक्रमास व मिरवणूकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भालेराव यांनी केले आहे . समितीचे उपाध्यक्ष कैलास गायकवाड व मंगल गायकवाड आहेत . मिरवणूक प्रमुख नीलेश जाधव ,सचिव -प्रमोद गायकवाड , कार्याध्यक्ष अविनाश शिंदे , सहकार्याध्यक्ष ॲड . कुणाल गायकवाड ,कोषाध्यक्ष सुनील थोरात , सहकोषाध्यक्ष बबन गायकवाड ,सहसचिव किरण दिवटे , हिशोबनीस - रमेश शिंदे , प्रसिध्दी प्रमुख - आदित्य उबाळे , मिरवणूक उपप्रमुख मयूर भोसले , रमेश कांबळे ,मिरवणूक सचिव हर्षद कांबळे , मिरवणूक कार्याध्यक्ष हर्ष गायकवाड , मिरवणूक सदस्य - बाळासाहेब राजगुरु , विशाल ससाणे ,प्रकाश डंबाळे , सदस्य - सचिन जाधव ,जयेश थोरात ,अमर झेंडे , नितीन काळे ,अकिल शेख अशी कार्यकारिणी आहे .