शिरुर दिनांक : (वार्ताहर )विजयाच्या संकल्पाची गुढी महाआघाडीच्या प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत शिरुर येथे स्टेट बॅक कॉलनीतील शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष व संस्थानिक  ॲड .सुभाष पवार यांच्या निवासस्थानी उभारण्यात आली . शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल काशिद , तालुकाप्रमुख रामभाउ सासवडे , युवासेनेचे जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे ,शहरप्रमुख मयूर थोरात ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे , भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे , जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार , बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे , उद्योजक गणेश पठारे , माजी नगरसेवक विठ्ठल पवार , सुरेश गाडेकर ,शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य जयवंत साळुंखे , सुदाम चव्हाण , आदी उपस्थित होते .

   आढळराव यावेळी म्हणाले की गुढी पाडवा हा मांगल्याचा सण असून सर्वाना पाडवाच्या शुभेच्छा पाडवा निमित्त विजयाच्या संकल्पाची गुढी वाघाळे येथील प्रसिध्द  ऐताहासिक  घराणे असणारे पवार घराण्यातील शिरुर येथे वास्तव्यास असणारे ॲड. सुभाष पवार यांच्या शिरुर शहरातील  निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उभारली असून सकाळी शिरुर शहरात जैन धर्माचे राष्ट्रसंत श्रमण महाराज यांचे ही आशिर्वाद घेतल्याचे त्यांनी सांगितले .